कॅमेरात कैद धक्कादायक घटना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल
हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.
मुंबई : सोशल मीडियावरील व्हिडीओ आपल्याला नेहमीच आश्चर्यचकीत करत असतात. इथे आपल्या असे काही व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहिल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो धक्कादायक आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा हिमस्खलनाचा आहे. किर्गिझस्तानच्या तियान शेन पर्वतरांगांमध्ये ही घटना घडली आहे. जी तेथे उपस्थीत असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेरात कैद केली आहे.
हा व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडातून एक शब्द निघणार नाही आणि तुम्ही तो पाहातच राहाल असं ते दृश्य आहे. हा हिमस्खलन पर्वताच्या शिखरावर पडलेल्या हिमनदीमुळे झाला होता.
खरंतर पर्वतांवर ब्रिटिश आणि अमेरीकन पर्यटक गिर्यारोहण करत होते. त्या दरम्यांना त्याना दुरवर हिमस्खलन होताना दिसलं, परंतु बघता, बघता हे हिमस्खलन त्यांच्यापर्यंत देखील येऊन पोहोचलं.
हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.
या घटनेत एका महिलेच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला घोड्यावर बसवून रुग्णालयात नेण्यात आले. वृत्तानुसार, एकूण 10 पर्यटक होते, त्यापैकी 9 ब्रिटिश आणि एक अमेरिकन होता.
हा पर्यटक हिमस्खलनाचा व्हिडीओ शुट करत असताना काही काळ तेथे थांबला, त्यानंतर जेव्हा हे त्याच्या जवळ येऊ लागलं तेव्हा त्याला आपल्या जवळच एक निवारा सापडला जेणेकरून तो या वादळातून वाचू शकेल आहेत.
त्या व्हिडीओत पुढे म्हटले आहे की, या सर्वांनी आणखी ५ मिनिटे ट्रेक केला असता, तर ते या हिमस्खलनाच्या खूपच जवळ पोहोचले असते, ज्यामुळे कदाचित या सर्वांचा मृत्यू झाला असता.
आपला अनुभव सांगताना या पर्यटकाने सांगितले की, या हिमस्खलन त्याला जोरदार धडक दिली. त्याला वाटले की, तो फक्त हलक्या पावडरने झाकलेला आहे. परंतु नशीबाने त्याला यामुळे कोणतेही नुकसान किंवा दुखापत झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ओरखडेही आले नाहीत. मात्र हिमस्खलन गेल्यानंतर या पर्यटकाला चक्कर येत होती. कारण त्याच्या ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती.
हा व्हिडीओ चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे.