खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लिम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा
पॅलेस्टाइनमधील `हमास` ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. पुढील काही दिवसांत हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणी चर्चेत आहे.
पॅलेस्टाइनमधील 'हमास' ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.
बाबा वेंगाचं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होतं. ती बल्गेरियातील एक फकीर महिला होती. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 साली झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झाले. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाणी केल्या होत्या.
बाबा वेंगाच्या अंदाजानुसार 2023 मध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं. यासोबतच त्यांनी सांगितलं होतं की, अण्वस्त्र हल्लादेखील होऊ शकतो, ज्यामुळे पृथ्वीवर विध्वंस होऊ शकतो. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे लोक घाबरले आहेत. त्यामुळे हे तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का? अशी शंका लोकांना सतावत आहे.
हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर युद्धास सुरुवात झाली आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आङे. 'आम्ही युद्धात आहोत. हमासने तेल अवीवसह देशभरातील विविध शहरांवर 5000 हून अधिक रॉकेट डागले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धानंतर जग दोन गटात विभागले गेले आहे. यानंतर आता लोकांना तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटत आहे.
बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. जगातील इतर देशही या युद्धात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नावाने लढताना दिसले तर नवल वाटण्याची गरज नाही. पण जर बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार अण्वस्त्र हल्ला झाला तर त्यानंतर होणाऱ्या विध्वंसाची कल्पनाही करता येत नाही.
याशिवाय बाबा वेंगाने आपल्या भविष्यवाणीत काही देश जैविक शस्त्रांनी हल्ला करेल, ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू होईल असंही म्हटलं होतं. त्यांनी या वर्षाचं वर्णन शोकांतिका म्हणून केलं होतं. यावर्षी भयंकर युद्ध आणि सौर त्सुनामी होईल अशी भीती बाबा वेंगा यांना होती. रशिया आणि युक्रेनमध्ये आधीच युद्ध सुरू आहे. आता यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे आता बाबा वेंग्यांची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे येणारा काळच सांगेल.