Financial Mistakes: पैसा असेल तर आपण जवळ-जवळ सर्व सुख अनुभवू शकतो. काही लोकांकडे कमी पैसा असून ही उत्तम व्यवस्थापन केल्याने त्यांची सेविंग्ज (Savings) चांगली होते आणि अनेकदा गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. पण अनेक लोक असेही आहेत, ज्यांच्याकडे पैशाची कसलीही कमी नाही तरीही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो किंवा त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.या वाईट सवयींमुळे (Bad Habits) लोकांकडे पैसा टिकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात 'या' वाईट सवयींबद्दल...


 पैशांसंदर्भातील वाईट सवयी (Bad Financial Habits)


1. पैसा म्हणजे तळ हाताचा मळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसा हा तळ हाताचा मळ आहे असं अनेकांच मत असतं. जेव्हा जितका मिळवता येतोय तितका मिळवावा, असा समज अनेकांचा असतो. ज्याठिकाणी 60 रुपयांमध्ये पोटभर जेवण केलं जाऊ शकतं त्याठिकाणी पिझ्झा खाण्यासाठी 400 रुपयांचा खर्च केला जातो. असा खर्च करणारी व्यक्ती ही नेहमी पैशांच्या तंगीमध्ये (Financial Problems) अडकलेली असते.


2. कमाईपेक्षा जास्त पैसे खर्च करण्याची सवय


मराठीमध्ये एक म्हण आहे ती म्हणजे, अंथरुण पाहून पाय पसरावे.ही म्हण या प्रवृत्तीच्या लोकांना तंतोतंत लागू होते,जे लोक त्यांच्या कमाईपेक्षा जास्त पैशांची उधळण करतात. काहींचा पगार 25 हजार रुपये असताना महिन्याला 40 हजारांपेक्षा जास्त खर्च करतात. यामुळे अशा लोकांना कायम पैशांची अडचण निर्माण झालेली असते.


3. शॉपिंगचा छंद 


अनेकांना चित्रकला, गायन,डान्स करणं,वाचन किंवा चित्रकला असे छंद असतात.काही लोक असे असतात,ज्यांना शॉपिंग करण्याचा छंद असतो. शॉपिंगचा छंद असणाऱ्या व्यक्तींकडे पैसा टिकत नाही. अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा आवश्यक गोष्टींवर खर्च केल्याने पैशांची चांगली सेविंग होऊ शकते.  


4. शो ऑफ करणं टाळवं


अनेकांना आपण किती पैशावाले आहोत हे सिद्ध करण्याची सवय असते. एखादी चांगल्या क्वालिटीची वस्तू दुकानांमध्ये 300 रुपयांला मिळत असेल आणि ती परवडणार नाही असं माहित असताना देखील तीच वस्तू मॉलमधून खरेदी करतात. केवळ शो ऑफ करण्यासाठी काही लोक महागड्या वस्तू खरेदी करतात. 


5. दररोज पार्टी करणं बंद करावं


पैसा आहे म्हणून तो कसाही वापरावा असा काही लोकांचा समज असतो. काही लोकांच्या या समजामुळे त्यांना दररोज पार्टी करण्याची सवय लागते.  दररोज पार्टी केल्याने पैशाची कमतरता निर्माण होते. म्हणून, कारण नसताना रोजरोज पार्टी करणं बंद करावं. यामुळे तुमच्याकडे पैशांची चांगली बचत होऊ शकते.