ना सूर, ना ताल, गाणं ऐकणाऱ्यांचे झाले हाल... ! प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी केली अटक
वाईट आवाजात गाणाऱ्या सोशल मीडिया स्टारला अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Trending News : सोशल मीडिया स्टार हिरो आलोमला (Hero Alom) गाणं म्हणणं चांगलच महागात पडलं आहे. पोलिसांनी आलोमला अटक करत त्याची तब्बल 8 तास चौकशी केली. इतकंच नाही तर पुन्हा शास्त्रीय गाणी गाणार नाही असा माफीनामाही त्याच्याकडून पोलिसांनी लिहून घेतला. गायक म्हणून अलोम अतिशय वाईट असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
हिरो आलम बांगलादेशमध्ये रहाणारा असून तो तरुणाईमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. फेसबूकवर आलोमचे तब्बल 20 फॉलोअर्स आहेत तर युट्यूब चॅनेलवरही 14 लाख सब्सक्राईबर्स आहेत. आलोम स्वत:ला गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून घेतो. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर पाहिले जातात. आपल्या विचित्र गायकीमुळे तो नेहमची चर्चेत असतो.
पण या गायिकीमुळेच तो अडचणीत सापडला. काही लोकांनी आलोमविरोधात तक्रार दाखल केली अलोम फारच वाईट गातो तसंच शास्त्रीय गाणं बेसूर आवाजात गातो अशी तक्रार त्याच्याविरुद्ध करण्यात आली. दरम्यान, आलोमने पोलिसांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
आलोमने आत्तापर्यंत पोलिसांचा गणवेश परिधान केल्याबद्दल आणि त्याच्या व्हिडिओंमध्ये परवानगीशिवाय टागोर आणि नजरुलची गाणी गायल्याबद्दल माफी मागितली आहे. आलोमने त्याच्या गाण्याची शैली बदलली असून जुन्या सवयींची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही त्याने पोलिसांना दिली आहे.