ओबामा दाम्पत्यांचे `हे` पत्र सोशल मीडियावर व्हायरल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर्वसामान्यांना परिचयाचे आहेत. कारण ते सामान्य जनतेत सहज मिसळतात. त्याचा प्रत्यय अनेकांनी घेतलाय. तसाच एक अनुभव एका लग्नाच्या निमित्ताने आलाय. त्यांनी लग्नाबाबत दिलेल्या शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सर्वसामान्यांना परिचयाचे आहेत. कारण ते सामान्य जनतेत सहज मिसळतात. त्याचा प्रत्यय अनेकांनी घेतलाय. तसाच एक अनुभव एका लग्नाच्या निमित्ताने आलाय. त्यांनी लग्नाबाबत दिलेल्या शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बराक आणि मिशेल यांची साधी राहणी आणि त्यांचे तसेच राहणीमान अनेकांना भावलंय. ब्रूक अॅलेन यांच्या आईने मार्च महिन्यात ओबामा दाम्पत्यांना आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवली होती. मात्र, त्यांना लग्नाला जायला मिळालं नाही.
काही महिने गेल्याने आपण ओबामांना निमंत्रण पाठलंय हे ब्रूकची आई लित्झ विसरुन गेली. मात्र, पाच महिन्यांनंतर ओबामा-मिशेल यांच्याकडून ब्रूकला पत्र आलं, तेव्हा तिचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांना एक सुखद धक्का बसला.
ते लग्नाला येऊ शकले नसले तरी त्यांनी ब्रूकला तिच्या भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा पत्रातून दिल्या. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमचा संसार सुखाचा होईल आणि हे नातं अधिक घट्ट होईल, अशी आम्ही आशा करतो, या पत्रात नमुद केलं. एवढंच नाही तर या पत्राच्या खाली दोघांची सही होती. त्यामुळे त्यांना कोण भरुन आनंद झालाय. माझ्यासाठी ही सुंदर भेटवस्तू होती, अशी प्रतिक्रिया तिने पत्र वाचून दिली.