मुंबई : ख्रिसमससाठी अवघे आठवडा उरला आहे सगळीकडे याचा उत्साह पाहायला मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सांताक्लॉजची भयंकर क्रेझ आहे. सांताक्लॉज आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आपल्या गिफ्ट देतो असं प्रत्येक लहानमुलाला वाटत असतं. असंच खास सांताक्लॉजचं रूप घेऊन प्रत्यक्ष अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलं आहे. 


ओबामांनी नाताळबाबाचे रूप घेऊन अनेक लहान मुलांना भेटी देत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल हे नेहमीच काहीतरी हटके प्रयोग करत असतात. त्यांनी आपल्या याच अंदाजात वॉशिंग्टनमध्ये काही लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या. हा अनोखा सांताक्लॉज मुलांना चांगलाच भावला. सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंमुळे लहान मुलांच्या आनंदाला उधाण आले.



बराक ओबामा यांनी सांताक्लॉजसारखी लाल रंगाची टोपी डोक्यावर घातली होती. तसेच विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी भरलेली पोतडीही ते त्यांच्या खांद्यावर घेऊन आले होते. वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी अवघा अर्धा तास घालवला. पण या भेटीमुळे लहान मुले चांगलीच खूश झाली. बराक ओबामा सांताक्लॉज झाल्याचा व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. 



सांताक्लॉजच्या रूपातले ओबामा कसे दिसतात याबाबत नेटकऱ्यांनी चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. ओबामा यांनीही या मुलांसोबतचा फोटो रिट्विट करत आपण हे क्षण खूप आनंदाने साजरे केले असे म्हटले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  बराक ओबामा यांनी केलेल्या या हटके प्रयोगाचे नेटकऱ्यांनी स्वागत केले आहे.