शशी कपूरांच्या निधनाची बातमी करताना बीबीसीने केली `ही` चूक
मुंबई : अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देशा-परदेशात झपाट्याने पसरली. त्यानंतर मीडीयामध्ये सार्याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र जागतिक ख्यातीच्या बीबीसी द्बारा मात्र एक चूक झाली. त्यानंतर सोशल मीडीयात या वृत्तावर आणि बीबीसीवर टीका करण्यात आली.
बीबीसीने काय चूक केली ?
बीबीसीने शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या गाण्याची क्लिप दाखवली. यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाली. परिणामी बीबीसीने तात्काळ याबाबत माफी मागितली. त्यासंबंधी ट्विटदेखील करण्यात आले आहे.
शशी कपूर यांचे निधन
अभिनेते शशी कपूर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोशल मीडीयात चूक
काही ट्विटरकरांनी शशी कपूर यांच्या ऐवजी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना श्रद्धांजली वाहिली होती.