धक्कादायक! Bed Bath And Beyond च्या CFO चा इमारतीवरून पडून मृत्यू
इतकं वाईट कोणासोबत होऊ नये...., असं काय घडलं की त्या CFO नं उचललं टोकाचं पाऊल
मुंबई : बेड बाथ अँड बियॉन्ड (Bed Bath And Beyond) कंपनीच्या सीएफओ गुस्तावो अर्नल (Gustavo Arnal) यांचं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क येथील जेंगा टॉवरच्या 18 व्या मजल्यावरू पडून अर्नय यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. रिपोर्टनुसार, 52 वर्षीय गुस्तावो अर्नल 2020 मध्ये यूएस रिटेल स्टोअर चेन बेड बाथ अँड बियॉन्डमध्ये (Bed Bath And Beyond) सामील झाले होते. याआधी तो एव्हॉन या कॉस्मेटिक ब्रँडसाठी काम करत होते. यानंतर त्यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बलसाठीही काम केले. (Bed Bath And Beyond company CFO Gustavo Arnal)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्नल यांनी शुक्रवारी मॅनहॅटनच्या ट्रिबेका परिसरातील 56 लिओनार्ड स्ट्रीटच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारली. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक संकटांचा सामना करत होते. ते बेड बाथ अँड बियॉन्ड इंकचे कार्यकारी उपाध्यक्ष देखील होते.
अर्नल यांच्या मृत्यूनंतर लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर अर्नल यांची ओळख पटली. महत्त्वाचं म्हणजे यूएस-आधारित साखळी Bed Bath & Beyond आर्थिक संकटाचा सामना करत होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 16 ऑगस्ट रोजी, अर्नलने कंपनीच्या स्टॉकमधील 42,513 शेअर्स अमेरिकी डॉलरपेक्षा थोड्या अधिक किमतीत विकले. याशिवाय कंपनीने नुकतीच आपली 150 स्टोअर्स बंद करण्याची घोषणा केली होती.
त्याच वेळी, Bed Bath & Beyond Inc. देखील आपल्या कर्मचार्यांना कामावरून काढून बचत करण्यावर लक्ष केंद्रित करत होती. शिवाय सलग दुसऱ्या तिमाहीत होत असलेल्या नुकसानामुळे कंपनी तोट्यात होती.