Ben Francis Success story: मनात काही वेगळं आणि हटके काही करण्याची इच्छा असेल तर, अशक्य गोष्ट देखील मेहतीने शक्य करता येते. अशीच गोष्ट आहे एका यशस्वी मुलाची. आज जगभरात या तरुण उद्योगपतीची (Young businessman) चर्चा आहे. त्याचा ब्रँड केवळ अमेरिका आणि युरोपमध्येच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध. आश्चर्य म्हणजे हा तरुण एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरीचं (Pizza delivery BOY) काम करायचा पण आज त्यांची संपत्ती 6000 कोटींहून अधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 6000 कोटींची संपत्ती असणाऱ्या उद्योगपतीचं नाव 
फोर्ब्सच्या यादीतही त्याचे नाव समाविष्ट झाले आहे. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या या उद्योगपतीचे नाव आहे बेन फ्रान्सिस (Ben Francis), ज्याने वयाच्या 30 व्या वर्षी जे करून दाखवलं ते कौतुकास्पद आहे. चला जाणून घेऊया बेन फ्रान्सिसची यशोगाथा.



पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या प्रवासाच्या चमत्कारला नमस्कार
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूकेमध्ये राहणाऱ्या बेन फ्रान्सिसला (Ben Francis gym) जिम करण्याची खूप आवड होती. पण त्याला त्याच्या आवडीचे जिमचे कपडे मिळत नव्हते. मग अचानक एके दिवशी त्याच्या मनात असा विचार आला की त्याने स्वतःचे कपडे स्वतः बनवायचे ठरवले. 


शून्यातून व्यवसायाला सुरुवात (Ben Francis Start a business)
त्या काळात बेन बर्मिंगहॅम येथील एका विद्यापीठात शिकत होता आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून स्वतःचा खर्च भागवत असे. जिममध्ये तासनतास घालवण्याची बेनची सवय आजही तशीच आहे, जेव्हा त्याने शून्यातून व्यवसाय सुरू केला होता. 


बेन फ्रान्सिसच्या  ब्रँडचं नाव
सुरुवातीला त्याने एका गॅरेजमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. जिथे तो त्याच्या आवडीचे कपडे विकायचा. सुरुवातीला त्याला त्याच्या डिझायनर कपड्यांचा खूप फायदा झाला. पुढे त्याने आपल्या जिम वेअर व्यवसायाला 'जिमशार्क' (Gymshark) असे नाव दिले आणि एक छोट्या कंपनीची सुरुवात केली. 


फोर्ब्सच्या यादीत बेन फ्रान्सिसचं नाव
फोर्ब्सच्या यादीत बेन फ्रान्सिसचं नावही सामील झाले आहे. त्याने 2012 मध्ये त्याच्या पालकांच्या गॅरेजमध्ये कपड्यांचं एक छोटं दुकान सुरू केलं. आज तेच दुकान जगातील एक प्रसिद्ध ब्रँड बनलं आहे. या ब्रँडच्या लोकप्रियतेने 5 वर्षात यशाचा नवा इतिहास रचला. (Ben Francis name in Forbes list)


बेन फ्रान्सिसचं खासगी आयुष्य
आज, जिमशार्क कंपनीचा मालक बेन फ्रान्सिसची गेल्या वर्षी एकूण संपत्ती 6371 कोटी रुपये होती. बेन लवकरच जुळ्या मुलांचा वडील होणार आहे. 



आज त्यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत. बेन फ्रान्सिस आपल्या रॉयल लाईफस्टाईलचे फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असतो. बेन फ्रान्सिसच्या यशाच्या चर्चा साता समुद्रापार पसरलेल्या आहेत.