काबूल : अफगाणिस्तानने तालिबानसमोर पराभव स्वीकारला असून आपली नांगी टाकली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. इतकच नाही तर टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती मिळाली आहे. अफगाण सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते पाकिस्तानला पळून गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींना सुखरूप देशाबाहेर नेण्यासाठी अमेरिकेचे हेलिकॉप्टर्सही पोहोचली होती असंही सांगितलं जात आहे. अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर आता राष्ट्रपतीपदाची सूत्र कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तालिबानी कमांडर अब्दुल गनी बरादर नवे राष्ट्रपती होऊ शकतात अशी चर्चा आहे. तिथे सध्या सुरू असलेल्या वादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव आहे. 



शांततेत सत्ताबदल करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. तालिबानी आणि अफगाण सरकार प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, विविध देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षिततस्थळी हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 129 भारतीय नागरिकांना दिल्लीमध्ये सुरक्षित आणण्याची मोहीम राबवली जात आहे. 


 


भारतानं काबूलमधील दुतावास अद्याप बंद केलेला नाही. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन करत असल्याची माहिती भारतीय दुतावासातील सूत्रांनी दिली आहे.