अमेरिकेचा आणखी एक मोठा निर्णय, तालिबानची कंबर मोडणार?
अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर तालिबानची कंबर मोडण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहे.
वॉशिंग्टन : भारत आपल्या लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. स्थानिक परिस्थिती पाहता अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलावर आहे. त्याच वेळी, तालिबान आता अफगाणिस्तानमध्ये आपले नवीन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
बायडेन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अमेरिका यापुढे अफगाणिस्तान सरकारशी कोणताही शस्त्र व्यवहार करणार नाही. असे सर्व सौदे रद्द करण्यात आले आहेत.
याआधी अमेरिकेने अफगाणिस्तानची संपत्ती असलेले खाते फ्रीज करण्याता निर्णय घेतला होता. त्यामुळे तालिबानला हा पैसा मिळणं अशक्य झाले आहे. अफगाणिस्तानचा अधिक पैसा हा अमेरिकेतील बँकेतच ठेवला गेला आहे.
भारत सरकारचे नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे की, सरकार अफगाणिस्तानातून भारतीयांना आणण्यासाठी कटिबद्ध आहे.
अफगाणिस्तानच्या संकटात, परराष्ट्र मंत्री जयशंकर उद्या म्हणजेच शुक्रवारी न्यूयॉर्कहून भारतात परत येवू शकतात. त्यांना पुढे मेक्सिको, पनामाला जायचे होते पण ते सध्या भारतात परतणार आहेत.
माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई, अब्दुल्लासह इतर नेत्यांनी गुरुवारी काबूलमध्ये पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर यावेळी चर्चा झाली.
अमरुल्ला सालेहशी संबंधित ट्विटर खात्यावर कारवाई
अशरफ घनी यांच्या अनुपस्थितीत, स्वतःला काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित करणारे अमरुल्ला सालेह यांचे कार्यालय आणि पक्षाशी संबंधित ट्विटर खाती निलंबित करण्यात आली आहेत. अमरुल्ला सालेह सतत तालिबानच्या विरोधात ट्विट करत होते.