दहशतवादाविरोधात मोठी कारवाई; एकाच वेळी ५० दहशतवाद्यांचा खात्मा
पाहा कुठं घडली ही घटना
पॅरिस : दहशतवादाच्या समस्येचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्व राष्ट्र प्रयत्नशील असताना आता त्या दृष्टीकोनातून पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला याचसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.
फ्रान्स सरकारच्या दाव्यानुसार मध्य माली येथे सैन्यानं केलेल्या एका कारवाईमघ्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या जवळपास ५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या रक्षामंत्र्यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. मागील आठवड्यापासून याच क्षेत्रात ही मोहिम हातात घेण्यात आली होती.
संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालीमध्ये ३० ऑक्टोबरला आमच्या जवानांनी ५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पार्ली यांनी सैन्याच्या या कामगिरीला सलाम करत त्यांचे आभारही मानले.
फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईसाठी बुर्किना फासो आणि नाईजर सीमालगतचा भाग या ठिकाणांची निवड करण्यात आली होती. दहशतवादाविरोधात सध्या फ्रान्समध्ये कठोर पावलं उचलण्यात आली असून, ही घटनासुद्धा त्यातीलच एक भाग आहे.