Viral Wedding: देशभरात लग्नाचा (Wedding) माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती निघतात. असा सर्व लग्नाचा (Wedding) माहोल सुरू असताना आता एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. ही लग्नाची गोष्ट वाचून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण एका नेदरलँडच्या तरूणीने (netherlands girl) भारतीय तरूणासोबत (Indian boy) लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


 पहिली भेट कशी झाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता. 


जोडपं प्रेमात पडलं


ऑस्ट्रेलिया फिरल्यानंतर दोघेही एकमेकांना आवडू लागले होते. पण एका ठिकाणी शिफ्ट होण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या जोडप्याने नेदरलँड्सला जाण्याची योजना आखली होती. आदि जून 2020 मध्ये मायराचे येथे गेला आणि तेथे राहू लागला. या दरम्यान त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय़ घेतला होता.


हिंदू रितीरिवाजानुसार लग्न 


आदि आणि मायराने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी आपआपल्या कुटूंबियाशी बोलणी केली.दोन्ही कुटूंबाकडून होकार आल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी भारतात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत.


यूट्यूब चॅनल


या जोडप्याने लेट्स मीट अब्रॉड नावाचे एक यूट्यूब चॅनलही सुरू केले होते. या यूट्यूब चॅनलवर जवळपास 42 हजार सबस्क्राइबर्स आहेत. त्याच वेळी, कपलच्या इंस्टाग्राम पेजवर सुमारे 11 हजार फॉलोअर्स आहेत.



दरम्यान आता या भारतीय-डच जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. नुकतेच या जोडप्याचे लग्न झाले आणि ते दोघे हनिमूनसाठी थायलंडला गेले. या जोडप्याने लग्न आणि हनिमूनचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.


सध्या या जोडप्याची सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे. त्यांचे फोटो व्हायरल होत आहे.