मुंबई : Microsoft चे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत नाव येणाऱ्या बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पत्नीला घटस्फोट दिला. संपूर्ण जगासाठी ही घटस्फोटाची बातमी धक्का देणारी ठरली. घटस्फोटानंतर बऱ्याच महिन्यांनी गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा यांनी या नात्यावर आणि त्यात आलेल्या वादळावर वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिल गेट्स यांना त्यांच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांसाठी माफही केल्याचं त्यांनी सांगितलं. पण, एका वळणानंतर मात्र या नाक्यात एकत्र राहण्यात काहीच तथ्य नव्हतं असं ज्यांनी जाणलं. 


मी क्षमा करण्यावर कायम विश्वास ठेवते. त्यामुळे मला वाटत होतं की आम्ही या नात्याला सांभाळून घेऊ, असं त्या गेट्स यांच्या त्या प्रेमप्रकरणांविषयी म्हणाल्या. 


मेलिंडाशी घटस्फोट झाल्यानंतर लगेचच बिल गेट्स यांच्याशी संलग्न एका व्यक्तीनं त्यांच्या 20 वर्षांपूर्वीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणावरून पडदा उचलला होता. 


'ते एक कारण नव्हतं, किंवा कोणती एक गोष्ट नव्हती ज्यामुळे आमची नाती बदलली होती. एक वळण असं आलं जेव्हा आमच्यामध्ये काहीच उरलं नाही. तेव्हा जे काही घडलं त्यावर विश्वासच बसत नाही. कित्येकदा तर संतापही अनावर झाला', असं मेलिंडा म्हणाल्या. 


आता कुठे त्या या नात्यात मिळालेल्या विश्वासघातातून आणि नात्याच्या वेदनांपासून दूर जात आहेत. स्वत:ला सावरु पाहत आहेत. आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान आपण पलटत आहोत, असंच त्या म्हणाल्या. 



कशी झाली पहिली भेट ? 
1987 मध्ये मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्ट जॉईन केलं आणि तिथेच बिल- मेलिंडा यांची पहिली भेट झाली. 1994 मध्ये या जोडीनं लग्नगाठ बांधली. ही जोडी फक्त या नात्यातच नव्हे, तर एका संस्थेचीही स्थापना केली, ज्या माध्यमातून त्यांनी जगभरात समाजसेवा सुरु केली. 


ही संस्था जगभरात संसर्गानं पसरणाऱ्या आजारांशी संबंधित आणि लसीकरणाशी संबंधित कामं करते.