Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे.. कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळी सुट्टीसाठी संसदेत 'दिवाळी डे कायदा' विधेयक मांडलंय. काँग्रेसकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक सहीसाठी राष्ट्राध्यक्षांकडे पाठवलं जाईल. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील 44 लाख भारतीयांना दिवाळीची सरकारी सुटी मिळू शकते. कनिष्ठ सभागृहाच्या खासदार ग्रेस मेंग यांनी दिवाळीला सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी होती. त्यासाठी त्यांनी संसदेत विधेयकही मांडले आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी तसेच क्वीन्स, न्यूयॉर्क आणि अमेरिकेतील लाखो कुटुंबांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. 14 वर्षांपूर्वी 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून व्हाइट हाऊसमध्ये दरवर्षी दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो.


यूएन इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 1.80 कोटी परदेशी भारतीय आहेत. यापैकी 44 लाख लोक अमेरिकेत राहतात. येथे 6 राज्यांतील 10 जिल्ह्यांमध्ये भारतीय-अमेरिकन लोकांची संख्या 6-18 टक्के आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, इलिनॉय येथे त्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.


याआधी न्यूयॉर्कच्या विधानसभेत दिवाळीला सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले होते. न्यूयॉर्क असेंब्ली स्पीकर कार्ल हॅस्टी यांनी निवेदन करताना म्हटले, न्यूयॉर्कची वैविध्यपूर्ण संस्कृती ओळखणे आवश्यक आहे. अमेरिकेत अनेक समुदाय आणि संस्कृतीचे लोक राहतात. हे लोक आपल्या देशाची ताकद आहेत. दिवाळीला सुट्टी जाहीर करणे हा अमेरिकेत सर्व समाजाचे लोक समान मानले जातात याचा पुरावा ठरेल, असे काँग्रेसच्या ग्रेस मेंग यांनी म्हटले आहे. यासोबतच अमेरिकनांना या फेस्टिव्हलबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मला आशा आहे की हे विधेयक लवकरच मंजूर होईल. आता हे विधेयक मंजूर झालेय. त्याच्यावर अंतिम मोहर उमटणार असल्याने भारतीयांना दिवाळीची सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


यावर्षी आम्ही पाहिले की आमचे संपूर्ण राज्य दिवाळीच्या समर्थनात आहे आणि दक्षिण आशियाई समुदायाला मान्यता आहे. राष्ट्रीय स्तरावर दिवाळीला अधिकृत सुट्टी बनवण्याची मोहीम मेंग राबवत आहेत. या विधेयकाचे स्वागत करताना न्यूयॉर्क असेंब्लीच्या सदस्या जेनिफर राजकुमार म्हणाल्या आमची मागणी पूर्ण होत आहे.