Teacher Caught Sharing Dirty Pics: शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवतो असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना अनन्य साधारण महत्त्व असतं. घरात आई वडिलांच्या शिकवणीनंतर मुलांवर संस्कार करणारी पहिली व्यक्ती म्हणजे त्यांचे शिक्षक. केवळ पुस्तकी शिक्षणच नाही तर समाजामध्ये वावरताना आवश्यक असणाऱ्या अनेक नैतिक गोष्टींची शिकवण कळत न कळत या शिक्षकांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना दिली जाते. हीच शिकवण पुढे या विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडते. मात्र ज्या शिक्षकांच्या शिकवणीवर अवलंबून राहून पालक निरधास्त राहतात तेच एखाद्या अश्लील वेबसाईटवर घाणेरडे व्हिडीओ अपलोड करत असतील तर? वाचून धक्का बसेल मात्र खरोखरच असा प्रकार समोर आला आहे.


...असा झाला भांडाफोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी एक शिक्षिका ओनलीफॅन्स या वेबसाईटवर अडल्ट कंटेंट शेअर करणारी मॉडेल असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ही महिला मुलांना बायोलॉजी शिकवते. मात्र सकाळी शिक्षिका म्हणून काम करणारी ही महिला रात्री ओनलीफॅन्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अश्लील व्हिडीओ आणि फोटो शेअर करायची. ओनलीफॅन्स या माध्यमावर अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते कंटेट पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना पैसे देतात. पैशांसाठी ही शिक्षिकाही स्वत:चे अश्लील फोटो शेअर करायची. एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी या महिलेचा व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर पाहिल्यानंतर शिक्षेकेचं गुपित समोर आलं. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि पालकांनी या शिक्षिकेची तक्रार केली. 


कोण आहे ही शिक्षिका?


समोर आलेल्या माहितीनुसार या शिक्षिकेचं नाव रोक्साना डोस रिस अब्रांतेस असं आहे. रोक्साना ही अश्लील साईट्सवर स्वत:चे घाणेरडे फोटो शेअर करायची. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ या साईट्सवर आहेत. रोक्सानाची तक्रार एथिक्स कमेटी ऑफ द फेडरस इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशन, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी ऑफ एस्पिरीटो सॅण्टो या संस्थेकडे करण्यात आली आहे. रोक्सानाचा अश्लील व्हिडीओ एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलवर पाहिला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. 



तपास सुरु


ही बातमी पसरल्यानंतर आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रोक्सानाचं केवळ या वेबसाईटवर अकाऊंट नसून तिचं ट्वीटरवरही अकाऊंट आहे. या अकाऊंटवरही तिने अनेक अश्लील फोटो पोस्ट केला आहे. तक्रार मिळल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील नितीमत्तेसंदर्भातील देखरेख करणाऱ्या समितीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. रेक्सोनाविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच तिच्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आलं आहे.