Black Hole Found Near Earth: अंतराळ संशोधकांनी आपल्याच आकाशगंगेमध्ये एक मोठ्या आकाराचं कृष्णविवर म्हणजेच ब्लॅकहोल शोधून काढलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृष्णविवर पृथ्वीपासून तुलनेनं जवळ आहे. कृष्णविवरांचं आकारमान आणि अंतराळातील अंतरांचा संदर्भ लक्षात घेतल्यास हे कृष्णविवर पृथ्वीच्या फारच जवळ असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. हे कृष्णविवर 2 हजार लाइट वर्ष अंतरावर आहे. म्हणजेच प्रकाशाला त्या ठिकाणी पोहचण्यासाठी 2 हजार वर्ष लागतील एवढ्या दूरवर हे कृष्णविवर आहे.


कसं आहे हे कृष्णविवरं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आकाशगंगेत सापडलेलं हे सर्वात मोठं कृष्णविवर आहे. एका ताऱ्याचा स्फोट होऊन हे कृष्णविवर तयार झालं आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये आतापर्यंत आढळून आलेलं हे दुसरं कृष्णविवर आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असललेलं सॅजिटेरिएअस ए* (Sagittarius A*) असं आकाशगंगेत आढळून आलेलं पहिलं कृष्णविवर आहे. मात्र हे कृष्णविवर ताऱ्याचा स्फोट होऊन तयार झालेलं नाही. या कृष्णविवराचा संबंध आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीशी आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने आढळून आलेली खगोलीय गोष्ट ही एकुलती एक अशी घटना आहे ज्यामध्ये आपल्या आकाशगंगेत अशापद्धतीने ताऱ्यापासून निर्माण होणारं कृष्णविवर निर्माण झालं आहे. 


अजूनही अशी कृष्णविवरं सापडण्याची शक्यता


युरोपीयन स्पेस एजन्सीच्या गिया (Gaia) मोहिमेअंतर्गत युसीएल संशोधकांनी हे कृष्णविवर शोधून काढलं आहे. त्यामुळे या कृष्णविवराला गिया-बीएच3 असं नाव दिलं आहे. या कृष्णविवराचं वजन सूर्याच्या वजनाच्या 33 पट अधिक आहे. गिया-बीएच3 हे कृष्णविवर थेट दिसून आलं नाही. मात्र या भागातील हलचालींवरुन येथील एकमेव ताऱ्याचं आता कृष्णविवरामध्ये परिवर्तन झाल्याचं स्पष्ट होत आहे. या संशोधनामुळे या भागात अशाप्रकारचे अजूनही ताऱ्यांपासून तयार झालेले कृष्णविवर पुढील डेटा सेटमध्ये सापडून शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या आपल्या आकाशगंगेचं मोजमाप करण्याचं काम गिया स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामध्येच हा खुलासा होईल असं सांगितलं जात आहे. या संशोधनामधील पुढील डेटा 2025 च्या शेवटापर्यंत रिलीज केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


आतापर्यंत बाहेरच्या आकाशगंगेत सापडली अशी कृष्णविवरं


या संशोधनाचं नेतृत्व करणारे सीएनआएस ऑब्झर्व्हट्री द पॅरिसचे पास्क्वेले पानुझो यांनी, 'अशाप्रकारचं संशोधन तुम्ही संशोधक म्हणून आयुष्यात एकदाच करता', असं म्हणत हा फार दुर्मिळ शोध असल्याचं म्हटलं आहे. 'आतापर्यंत एवढ्या मोठ्या आकाराची कृष्णविवरं ही केवळ बाहेरच्या आकाशगंगेमध्ये आढळून आली आहे,' असंही पानुझो म्हणाले. सर्वसामान्यपणे आपल्या आकाशगंगेत तयार होणाऱ्या कृष्णविवराचं सरासरी वजन सूर्याच्या 10 पटीपर्यंत असतं. मात्र सध्या सापडलेल्या कृष्णविवराचा पृथ्वीला काहीही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.