वॉशिंग्टन :  अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडन (President-elect Joe Biden)यांच्याकडून निवडणूक हरल्यानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांचे व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. नुकत्याच निवडल्या गेलेल्या रिपब्लीकच्या खासदारांनी (Republican lawmakers)निर्णयात बदल होण्याचे प्रयत्न फेटाळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प कॅम्पेन ( Donald Trump's campaign )च्या लोकांनी प्रमुख राज्यांमध्ये येऊन निकाल बदलण्याचा प्रयत्न केला. या कारणाने शुक्रवारी ट्रम्प यांनी मिशिगनच्या रिपब्लीक खासदारांची भेट घेतली होती. 


ट्रन्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये सिनेटचे बहुमत मिळवलेले नेते माइक शिर्के Mike Shirkey ) आणि हाऊस स्पीकर ली चैटफील्ड (Lee Chatfield ) यांची भेट घेतली.  मिशीगन निवडणूक निकाल बदलतील अशी कोणती माहिती आमच्याकडे नसल्याचे त्यांनी ट्रम्प यांना सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कायदेशीर बाबींचे पालन करु असे देखील त्यांनी ट्रम्प यांना सांगितले. 


मिशिगन मत मोजणी प्रक्रीया संकट आणि धमकींपासून मुक्त राहावी आणि सामान्या पद्धतीने व्हावी असे रिपब्लिक नेत्यांनी म्हटले होते.



जॉर्जियाकडूनही ट्रम्प यांचा अपेक्षाभंग


ट्रम्प यांना शुक्रवारी आणखी एक झटका मिळाला. जॉर्जिया हे औपचारिक रुपात आपला निकाल देणारं राज्य बनलं. म्हणजेच जॉर्जियातून जाहीर झालेल्या शेवटच्या निकालाने बिडेन १२ हजार ६७० मतांनी जिंकल्याचा दावा करण्यात आला आणि ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसला. 


सिनेटर मिट रोमनी यांच्यासहीत  अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. कोणत्या माजी राष्ट्राध्यक्षाने सत्तेत कायम राहण्यासाठी अलोकतांत्रिक पद्धतीचा वापर करावा याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 


सिनेटचे इतर रिपब्लीक खासदार बेन सासे आणि जोनी अर्न्स्ट यांनी देखील ट्रम्प यांची रणनीती फेटाळून लावली.