मुंबई : बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा अटलांटिक सिटी न्यू जर्सी इथं 11 ते 14 ऑगस्टला संपन्न होणार आहे. या अधिवेशनाला भारतातून अनेक दिग्गज सिनेस्टार उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, शंकर महादेवन, सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, शेफ विष्णू मनोहर आणि इतर महत्त्वाचे कलाकार हजेरी लावणार आहेत. या अधिवशेनामुळे अमेरिकेच्या विविध भागांतून अनेक गुणी कलाकारांच्या कलेचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. (bmm convention 2022 the convention of bmm brihan maharashtra mandal is in aatlantic city new jersey this year)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएमएम अधिवेशन म्हणजे सांस्कृतिक मेळावा. अत्यंत श्रवणीय अन दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, सोबतीला विविध प्रांतीय खांद्यपदार्थांची, रुचकर मराठी भोजनाची मेजवानी म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रसिकांसाठी अत्युच्य आनंदाची जणू पर्वणीच. ह्या सुग्रास, स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण जेवणाचा आस्वाद घेणे आणि तोसुद्धा आप्तेष्ट, परिवार आणि मित्रमंडळींच्या सोबतीने, अशी संधी कोण दवडणार? 


उत्तम भोजनाच्या जोडीला उत्तरोत्तर रंगत जाणारे, मनाला आनंद देणारे करमणुकीचे दर्जेदार कार्यक्रम हा सुद्धा अधिवेशनाचा महत्वाचा भाग असणार आहे. अधिवेशनाचे स्वरूप फक्त मनोरंजन नसून, तर आपल्या मनाला आनंद देतील, आपल्या विचारांना चालना देतील, माणसांना एकमेकांशी जोडतील असा असेल. हे चित्र प्रत्यक्षदर्शी साकारण्यासाठी एका उत्सवाच्या रूपात होणाऱ्या या मेळावाच्या यशाच्या मागे अनंत मदतीचे हात कार्यरत असणार आहेत. 


अधिवेशन आगळं वेगळं करण्यासाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहे. हे अधिवेशन काही प्रमाणात "Go Green" करण्याचा प्रयत्न हा आयोजकांकडून करण्यात आला आहे.


एज्युकेशन समिट 


दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘एज्युकेशन समिट’ जो आपल्या विद्यार्थ्यांना भारत आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल.


मराठी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बिझनेस कॉन्फरन्स आणि बिझनेस समिटचे आयोजन केलं आहे. बिझनेस कॉन्फरन्स हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो आम्ही अधिवेशनात राबवणार आहोत. महाराष्ट्रीय व्यापारी समुदायाला प्रोत्साहन देणे, शिक्षित करणे आणि सक्षम करणं हा यामागचा एकमेव उद्दिष्ट असणार आहे. 


'या' वेबसाईटवर तिकीट बूक करा 


यंदा अटलांटिक सिटी न्यू जर्सीमध्ये होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशनाला आणि तेथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही caravaanlife.com बुक करू शकता. त्यामुळे आताच तिकिट बूक करा आणि या अधिवेशनात सामील व्हा.