Justyn Vicky Dies in Gym Video: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेश इन्फ्लुइन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना विकी 210 किलो वजनाचा बारबेल उचलण्याच्या प्रयत्न करताच त्याची मान मोडली. त्यामुळं त्याते निधन झाले. 15 जुलै रोजी हा अपघात घडला असून इंडोनेशियातील बाली येथे ही घटना घडली आहे. 


210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जस्टिन विकी 210 किलो वजन असलेला बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत होता. त्यातवेळी बारबेल निखळून त्याच्या अंगावर पडला आणि त्याची मान मोडली. जिममधील हा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. विकीच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


व्हिडिओत कैद झाला थरार 


जस्टिन विकीचे वय अवघे 33 वर्ष होते. त्याच्या मृत्यूचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जस्टिन विकी खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याची मदत करण्यासाठी मागे एक माणूसही दिसत आहे. मात्र काही करण्याच्या आतच विकीचा तोल गेला आणि बारबेलचे वजन त्याच्या खांद्यावर पडले, असं व्हिडिओत दिसत आहे. 


काय घडलं नेमकं?


जस्टिन विकी जिममध्ये वर्कआऊट करत होता.  210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न करत होता. जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्कॉट्स करत असताना त्याचा तोल गेला. त्याचवेळी त्याच्या मानेवर बारबेलचे वजन पडले आणि तो बसलेल्या स्थितीतच खाली कोसळला. बारबेलचे वजन मानेवर पडल्याने त्याची मान मोडली.  व्हिडिओत हा संपूर्ण थरार कैद झाला आहे. जस्टिन वेटलिफ्टिंग करत असताना त्याच्या मागे असलेला व्यक्ती त्याला वजन उचलण्यासाठी मदत करत होता. पण काही कळायच्या आतच हा सर्व प्रकार घडला आहे. 


गंभीर दुखापत


दरम्यान, विकीच्या मानेवर बारबेलचे वजन पडल्याने त्याची मान तुटली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुस्सांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मज्जांतंतूना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.