बीजिंग : आताची मोठी बातमी. चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे.133 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. विमानाला हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बोईंग 737 विमान चीनमध्ये कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. (Boeing 737 plane carrying 133 passengers crashes in China)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्घटनाग्रस्त विमान चायना इस्टर्न एअरलाइन्सचे असून ते 133 प्रवाशांना घेऊन कुनमिंगहून ग्वांगझूला निघाले होते. त्यावेळी गुआंग्शी प्रदेशात या विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगरावर आग लागली आहे. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.



स्थानिक चीनी मीडियाच्या वृत्तानुसार, 133 प्रवासी घेऊन जाणारे बोईंग 737 प्रवासी विमान चीनमध्ये क्रॅश झाले आहे. चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान टेंग काउंटी, वुझोउ, गुआंग्शी येथे क्रॅश झाले. त्यानंतर डोंगराला मोठी आग लागली.