अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर आत्मघातकी हल्ल्यानं हादरलं. मोटरसायकलवरुन आलेल्या आत्मघातकी हल्लेखोरानं केलेल्या या हल्ल्यात 3 जण दगावले, तर 15 जण जखमी झाले आहेत. मात्र हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबुलमधल्या संरक्षण विभागाच्या परिसरातली ही घटना आहे. विशेष म्हणजे 31 मे रोजी काबुलमध्ये झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यानंतरचा हा दुसरा आत्मघातकी हल्ला आहे. संरक्षण विभागाच्या विदेश संपर्क कार्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर ही घटना घडल्याचं, संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय. 


काल अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटन परिसरातदेखील हल्ला झाला आहे. हा अमेरिकेतील ९/११ नंतरचा मोठा हल्ला ठरला आहे.