Breaking News : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला आहे. हल्लेखोरांनी काबूल शहरातील स्टार-ए-नाईन हॉटेलला टार्गेट बनवले. स्फोटानंतर या हॉटेलमधून जोर जोरात गोळीबाराचा देखील आवाज येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुरक्षा यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. हा हल्ला मुंबईतील 26/11 आणि दिल्लीतील भ्याड हल्ल्या सारखा आहे. लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडकीतून उड्या घेतल्या आहेत. याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.  व्हिडिओमध्ये हॉटेलच्या खिडकीतून आगीचे लोळ निघत असल्याचेही दिसत आहे. हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना बंधक बनवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पून्हा एकदा दहशत पसरली आहे.  


स्टार-ए-नाईन हे चिनी व्यावसायिकांचे पसंतीचे हॉटेल आहे. ब्लास्ट केलेल्यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार देखील केला आहे. चीनचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच व्यायसायिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. काबुल शहरातील शेअरनो भागात हे हॉटेल आहे.  या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतय व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. हल्लेखोरांची ओख अद्याप पटलेली नाही. तसेच यात कुणी दगवाल्याचे अथवा जखमी झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेले नाही.