Viral : तरुणी तरुणासोबत डेटवर (Dating) गेली होती. तरुणीचा तरुणासोबत डेटचा अनुभव खूपच वाईट होता. मात्र यानंतर तरुणाने उचललेले पाऊल पाहून तरुणीही हैराण झाली. वास्तविक तरुणाने डेटवर केलेल्या खर्चाचे बिल तरुणीला मेल केला. या तरुणीने टिकटॉक व्हीडिओद्वारे (Social Media) हा सर्व प्रकार सांगितला. (boy sent the girl the bill for the expenses during the dating by email)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीने दावा केला की ती रेस्टॉरंटचे अर्धे बिल देण्यासाठी तयार होती. मात्र तरुण स्वतः संपूर्ण बिल भरण्यास तयार झाला. फियोनाने सांगितले की, तरुणाने तिला ई-मेलद्वारे बिल पाठवलं. या बिलमध्ये तरुणाने फिओनाच्या खर्चाचा योग्य उल्लेख केला आहे.


व्हीडिओमध्ये काय म्हटलंय?


"तुम्ही बिलमध्ये जे पाहताय, ते मला एका अयशस्वी डेटनंतर मिळालंय. मी मस्करी करत नाहीये. मी त्याला म्हणाले की माझं तुझ्याशी प्रेमसंबंध नाहीयेत. मी सर्व काही अगदी नम्रपणे सांगितले, पण त्याने हा असा प्रतिसाद दिला", असं ही तरुणी या व्हीडिओत म्हणतेय. 


"मुद्दा पैशांचा नव्हता"


तरुणीनुसार, तरुणाचं म्हणंन होतं की ही त्याच्यासाठी पैशाची बाब नाही. पण त्याने हे सर्व तत्त्वानुसार केलं. त्या तरुणाने पाठवलेल्या इनव्हॉइसमध्ये जेवणाचं बिल 1 हजार  500 तर ड्रिंक 1 हजार 100 रुपये असल्याचे सांगितलं.


हे बिल मिळालं तेव्हा तरुणीचा विश्वासच बसला नाही. 'माफ करा मित्रा, परतावा मिळू शकत नाही, असं या तरुणीने टिकटॉकवर व्हिडिओला कॅप्शन दिलंय. 


"तरुणीने पैसे द्यावे"


या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. काही यूजर्स म्हणाले, तरुणीने तिच्या वाट्याचे पैसे पाठवावेत. त्या तरुणीचा जितका वेळ वाया गेला, त्या हिशोबाने पैसे मागणारा दुसरे इनव्हॉइस त्या तरुणीला पाठवावं, असं एका नेटकऱ्याने लिहिलंय.