COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन : नको तिथे लघुशंका करण्याची सवय अनेकांना असते. पण ही घाणेरडी सवय कशी अंगलट येऊ शकते याचे एक उदाहरण समोर आलेय.  एका सीसीटीव्ही फुटेजमधून लिफ्टमध्ये लघुशंका करणाऱ्या तरुणाची फजिती जगासमोर आलीय.


कंट्रोल पॅनलवर लघुशंका 


चीनच्या चोंगकिंगमध्ये एका युवकाने लिफ्टच्या कंट्रोल पॅनलवर लघुशंका केली. जिथे लिफ्टची बटण असतात अशा कंट्रोल पॅनलवर तो विनाकारण लघुशंका उरकू लागला. हा प्रकार करुन झाल्यानंतर आपली फजिती झाल्याचे त्याच्या लक्षात आले.


लाईट्सही बंद 


तो लिफ्टमधून बाहेर जायला निघाला. लिफ्ट उघडली पण क्षणार्धात बंद झाली. लिफ्टच्या आतील लाईट्सही बंद व्हायला लागली.


शिक्षा काय ?


त्याच्या सुदैवाने करंट लागून जिवाला हानी पोहोचली नाही. लिफ्टमॅनने त्यावा वाचविले. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिली यासंदर्भात माहिती मिळाली नाही.


२० हजार जणांची प्रतिक्रीया 


हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद होत होता. चीनमधील सोशल मीडियामध्ये हा व्हिडियो खूप व्हायरल होतोय. वीस हजाराहून अधिक जणांनी या व्हिडियोवर आपली प्रतिक्रीया दिलीयं.