मुंबईः एका मुलाचा अजगराशी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा अजगराशी खेळताना दिसत आहे. तिथे खेळत असताना अचानक अजगराने त्याच्यावर हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांच्या क्यूट हालचाली आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या व्हिडिओंना लोकांकडून भरभरून प्रेम मिळतं.  लोकांना असे व्हिडिओ बघायला आवडतात आणि लोक ते शेअरही करतात. काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


व्हिडिओमध्ये एक मुलगा सापाशी खेळताना दिसत आहे. हा मुलगा ज्या सापाशी खेळत आहे तो असा साप नसून अजगर आहे. या अजगरासोबत खेळणं या मुलाला चांगलंच महागात पडलं आहे..



व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येते. तो अजगराशी खेळत आहे. सापाशी खेळणे त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतं याची कदाचित त्याला कल्पना नाही, तो अजगराला त्याच्या कपाळावर ठेवू लागतो. तो थोडासा सरकताच तोच अजगर त्याच्यावर हल्ला करतो. सापाला हल्ला करताना पाहून मुलगा ओरडतो.


या व्हिडीओमध्ये दिलासा देणारी बाब ही की,हा मुलगा ज्या सापाशी खेळत आहे तो जाळीदार अजगर विषारी नाही मात्र त्याचे दात खूप मजबूत आणि तीक्ष्ण आहेत.


कपाळावर ठेवलेला अजगर जेव्हा मुलावर हल्ला करतो आणि तोंडात त्याचे केस पकडतो. मुलाचे केस सापाच्या दातात अडकतात. तरीही त्याला दुखापत होत नाही. हा व्हिडीओ कुठचा आहे, हे सध्या कळू शकलेले नाही. पण लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइकही केले आहे.