Viral Photo : अवघ्या 13 सेकंदांत शोधा चित्रातल्या 12 चुका; बघा बघा.... जमतंय का
एखादं कोडं, किंवा कोडं घालणारा एखादा फोटोसुद्धा त्याचाच एक भाग. असाच एक Brain Teaser फोटो नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हा फोटो किंवा हे चित्र 1950 मधील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Viral Photo : सोशल मीडियावर (Social media) सर्वच गोष्टी उथळ असतात असं नाही. काही गोष्टी अशाही असतात त्या नकळतच तुमच्यात दडलेली कौशल्य सर्वांपुढे आणत असतात किंवा त्यातल्या त्यात ही कौशल्य प्रभावी करत असतात. एखादं कोडं, किंवा कोडं घालणारा एखादा फोटोसुद्धा त्याचाच एक भाग. असाच एक Brain Teaser फोटो नुकताच समोर आला आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार हा फोटो किंवा हे चित्र 1950 मधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Brain exam Find the mistakes from this 1950 old picture)
हा काही साधासुधा (Viral photo) फोटो नाही, तर यामुळं तुमची एकाग्रता, निरीक्षण क्षमता आणि तुमच्या नजरेची परीक्षा पाहिली जात आहे. किंबहुना हा फोटो तुमच्याया कौशल्यांमध्ये (Skills) आणखी भर टाकत आहे.
अधिक वाचा : Birds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...
वेळ जात नाहीये , कंटाळा आलाय? हरकत नाही. लगेचच पाहा हा फोटो. यामध्ये तुम्हाला एक छान कुटुंब दिसेल. जिथे कुणी खाण्याचा आनंद घेतंय तर कुणी स्वत:मध्येच रमलं आहे. पण, या चित्रामध्ये काही गोष्टी चुकल्या आहेत. तुमच्या त्या लक्षात आल्या का?
तुमच्याकडे अवघी 13 सेकंद आहेत. डोक्याला चालना द्या, चष्मा लावा, बारीक नजरेनं पाहा या चित्रात नेमक्या काय चुका आहेत. बघा हं... घाई करा, कारण 13 सेकंदांमध्ये तुम्हाला 12 चुका शोधायच्या आहेत. All the best!
चित्र चारही बाजुंनी पाहा, वरखाली पाहा, माणसांचं काय सुरुये पाहा.... काही गडबड दिसली का? एखादी चूक तरी सापडली? नाही? हरकत नाही....
चला तर मग पाहुया या चित्रात नेमकं चुकलंय काय....
- चित्रात टी पॉटला हँडलच नाहीये.
- तिथं टेबलावर ब्रेड लोफचा आकार क्लाऊड म्हणजे ढगांप्रमाणे आहे आणि मुलानं कापलेला ब्रेडचा तुकडा आयताकृती आहे.
- चित्रातील मुलगी चहा चमचा ऐवजी बटर नाईफने ढवळतेय.
- ती महिला चहा कपऐवजी टेबलवर ओततेय.
- मुलाचा चष्मा पाहिला का, दोन वेगवेगळ्या आकारांचा आहे.
- मेणबत्ती असणारा लँप सॉकेटला का बरं लावला? गंमतच आहे ना...
- माणूस वर्तमानपत्र उलटं वाचत आहे.
- आरसा एकाच दोरीवर कसा टांगलाय?
- इलेक्ट्रीक हीटरमधून धूर येतोय. असं कुठे असतं का?
- पिंजऱ्यात मांजरीला डांबलंय.
- भिंतीवर लटकणारा फोटोही उलटा आहे.
- कॉफी टेबलला एक पाय नाहीये.