Plane crashes in Brazil's São Paulo : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण तुम्ही ऐकलीच असेल. पण याचा प्रत्यय देखील पहायला मिळाला. ब्राझीलमध्ये मोठी दुर्घटना समोर आली. 62 विमानांना घेऊन चाललेलं विमान कोसळलं अन् सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सध्या जगभरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, एका प्रवाशाचं नशिब असं काही चमकलं की, काही मिनिटामुळे त्याचा जीव वाचला. नेमकं काय घडलं? याचा अनुभव प्रवाशाने मांडला आहे. त्याचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होतोय.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलच्या साओ पाऊलोमध्ये विमानाचा भीषण अपघात झालाय. विमानातून 62 प्रवासी प्रवास करीत होते. कास्केवेलच्या एअरपोर्टवरून या विमनानं उड्डाण घेतलं. मात्र काहीवेळातच हे विमान  विनहेडो शहरात क्रॅश झालं. अपघातानंतर घटनास्थळावर रेस्क्यू टीम दाखल झालीय. बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पण कास्केवेलच्या एअरपोर्टवर उभ्या असलेल्या ॲड्रियानो ॲसिसचे काळजाचे ठोके चुकले अन् त्याने सुटकेचा श्वास घेतला. खरं तर ॲड्रियानो ॲसिस याला विमानतळावर पोहोचायला उशिर झाला अन् त्याचं विमान हुकलं. विमानात जाण्यासाठी ॲड्रियानो ॲसिस याने क्रु अधिकाऱ्यांशी भांडण देखील केलं. पण त्याला विमानात बसू दिलं नाही. 


विमानाने उड्डान घेतलं अन् ॲड्रियानो ॲसिस याला संताप अनावर झाला. त्याने दुसरी फ्लाईट शोधली आणि त्याचवेळी विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी समोर आली. ॲड्रियानो ॲसिसच्या काळजाचा ठेका चुकला अन् ॲड्रियानो ॲसिसने देवाचे आभार मानले. त्यानंतर त्याने मुलाखतीत झालेला किस्सा सांगितला. 



असिसने आउटलेटला सांगितले की जेव्हा तो विमानतळावर आला तेव्हा त्याने बोर्डिंगच्या घोषणेची वाट पाहिली, परंतु काहीही ऐकले नाही. नंतर काही तरी गडबड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तो धावत जाऊन बोर्डिंग गेटवर पोहोचला तेव्हा त्याला समजलं की बोर्डिंग जरा आधी झालंय. क्रूसोबत वाद आणि मारामारी झाली आणि त्याचे फ्लाइटही चुकली, पण काही वेळाने विमान अपघाताची बातमी ऐकून तो हादरला, असं तो सांगतो.


दरम्यान, देवाचे आभारी आहोत की मी त्या विमानात चढलो नाही, असंही असिसने यावेळी सांगितलं. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका प्रवाशाने प्रवास टाळला होता. त्यामुळे आता ब्राझिलमध्ये या घटनेचीच चर्चा होताना दिसत आहे.