ब्राझील : ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात एक भीषण अपघात झाला आहे. इथल्या तलावात बोटिंगचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांच्या बोटिवर अचानक दरड कोसळली. या अपघातात आतापर्यंत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. मिनास गेराईस राज्यातील फर्नेस तलावावर काही लोकं बोटिंगचा आनंद लुटत होते. यावेळी तलावाला लागून असलेल्या भल्यामोठ्या खडकाचा एक भाग काही बोटिंवर कोसळताना दिसत आहे. 


मिनास गिराईस राज्यात गेल्या २४ तासांपासून पाऊस पडत असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिनास गेराइस अग्निशमन दलाचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेवो डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 32 लोक जखमी झाले आहेत. 20 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. या अपघातात 3 बोटी अडकल्या.



फर्नेस तलावातील खडकाचा काही भाग मुसळधार पावसामुळे कोसळला. बेपत्ता लोकांचं शोधकार्य सुरु असून जखमींना आवश्यक ते उपचार देण्याचं काम सुरु असल्याचं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.