Brazil Village Story: मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत. लग्नासाठी मुलगी मिळेल म्हणून अनेक तरुण मेट्रोमॉनियल साइट्सवर आशा ठेवून राहीले आहेत. पण जगात असंही एक ठिकाण आहे, जेथे लग्नासाठी तरुण मिळेनासे झाले आहेत. हो. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 
या गावात सुंदर महिला आहेत पण त्यांना लग्नासाठी वर मिळेनासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलमधील नोइवा येथील एका गावातून हा प्रकार समोर आला आहे.  हे गाव डोंगरावर वसलेले आहे. येथे खूप सुंदर स्त्रिया असून त्या अविवाहित पुरुषांच्या शोधात आहेत. या गावात सुमारे 600 महिला राहत असल्याचे सांगितले जाते. आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळावा, ही एकच इच्छा या तरुणींची आहे. बरं..ही इच्छाच व्यक्त करुन त्या शांत राहिल्या नाहीत. तर त्यापेक्षाही एक पाऊल पुढे आल्या आहेत. लग्नासाठी त्या पुरुषांना पैसे द्यायलाही तयार आहेत. असे असूनही तेथील पुरुष लग्न करण्यास तयार होत नाही. यामागचं कारणं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


सुंदर स्त्रिया आयुष्याच्या जोडीदाराची वाट पाहतायत 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिला ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे महिला आणि पुरुषांचे गुणोत्तर चांगले नाही. येथे मुलांची संख्या ही मुलींच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळेच मुलींना त्यांच्या स्वप्नांचा राजकुमार मिळणे थोडे अवघड होऊन बसले आहे. या गावात तरुण असले तरी त्यांना गावात राहायला आवडत नाही. ते शहर सोडून जातात. त्यामुळे महिला गावात एकट्या पडल्या आहेत. याच कारणामुळे ब्राझीलच्या या गावातील महिला आपल्या आयुष्याच्या जोडीदारासाठी आसुसल्या आहेत.


लग्नासाठी मुलगा का सापडत नाही?


विशेष म्हणजे ब्राझीलच्या या गावात मुलींची संख्या जास्त आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हा आहे. आणि ही सर्व कामे महिलाच करतात. त्यामुळे गावातील पुरुष कामाच्या शोधात शहरात जातात. त्यामुळे येथे मुलांची संख्या कमी आणि मुलींची संख्या जास्त दिसून येते. हे आणखी एक कारण आहे ज्यामुळे पुरुषांना येथे महिलांसोबत राहणे आवडत नाही.


माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, गावातील किचकट नियमांमुळे मुले येथे राहण्यास मागत नाहीत. पुरुषांनी लग्न करून त्यांच्यासोबत गावात राहावे आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या नियमांचे पालन करावे अशी महिलांची इच्छा असते. पण पुरुषांना ही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे मुलींचे लग्न होणे थोडे अवघड काम होऊन बसले आहे.