मुंबई : भारतात तयार झालेली कोरोना लस ब्राझीलला पोहोचली आहे. यामुळे अमेरिकेनंतर सर्वात कोरोनाबाधित असलेल्या देशात काही जीव वाचतील अशी आशा केली जात आहे. कोरोना व्हॅक्सीन भारतातून ब्राझीलला रवाना झाल्यानंतर राष्ट्रपती बोलसोनारे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी हनुमानाचे एक फोटो शेअर केलेत. 


ब्राझीलच्या राष्ट्रपतींचं ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम बोलसोनारोने ट्विट करताना लिहिलं आहे की, ''नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी. ब्राझील या महामारीच्या काळात तुम्ही दिलेली साथ खूप मोलाची आहे. कोरोना लस ब्राझीलला पोहोचल्यानंतर त्यांना आभार मानले आहेत. 




ब्राझील आणि मोरक्कोत पोहोचली कोरोना लस शुक्रवारी सकाळी भारतातून कोविशील्डची २०-२० लाखाची खुराक मुंबई विमानतळाहून ब्राझील आणि मोरक्कोकरता रवाना झाली आहे. सीएसएमआयकडून जाहीर केलेल्या एका प्रेस नोटमध्ये म्हटलंय की,'सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया द्वारे तयार केलेल्या कोविशील्ड लसचे २० लाख खुराक घेऊन एक विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावून ब्राझीलकरता. आणि दुसरा २० लाख खुराक घेऊन विमान मोरक्कोला रवाना झाला.' २२ जानेवारी रोजीपर्यंत सीएसएमआयएने आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत कोविशील्डची १.४१७ करोड लस पोहोचवण्यात आली आहे. भारतातून बुधवारी भूटान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्सला कोविड १९ची लस पाठवण्यात आली.