Bride Groom Viral Video : इंटरनेटवर कधी कुठला व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये असेल तर आपल्या सांगता येतं नाही. सध्या सोशल मीडियावर एका वधूच्या व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्न हा वधू वराच्या आयुष्यातील सर्वात अस्मरणीय आणि सुंदर क्षण असतो. लग्नातील प्रत्येक विधी असो किंवा या लग्नातील प्रत्येक गोष्ट असो ती हटके आणि खास करण्यासाठी जोडपी नवीन नवीन कल्पना शोधून काढतात. अगदी लग्नात नवरदेव आणि नवरीची एन्ट्री कशी असेल यासाठी ते अनेक महिने त्यावर प्लॅनिंग करत असतात. (Bride Groom Viral Video In the reception the bride was beaten groom wwe move Trending Video google news now )


अरे नवरीला झालं तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू वरासोबत रिसेप्शनमध्ये एन्ट्री घेते पण पुढच्याच क्षणी ती नवरदेवाला सगळ्या पाहुण्यासमोर उचलून जमिनीवर पटकते. रिसेप्शनमधील पाहुणे नवरीची ही कृती पाहून आश्चर्यचकित झाले. नवरीला नेमकं झालं तरी काय असा प्रश्न उपस्थितींना पडला. पण यात एक मजेदार ट्विस्ट आहे.


मजेदार ट्विस्ट 



तुम्ही WWE चे चाहते असाल तर नवरीचं हे कृत्य तुमच्या लक्षात येईल. तुमच्यासारखीच ही नवरीमुलगीदेखील WWE ची मोठी चाहती आहे. डब्लूडब्लूई इतिहासातील सर्वात प्राणघातक फिनिशर म्हणून ओळखल्या जाणार्‍या, स्टीव्ह ऑस्टिनचा स्टोन कोल्ड स्टनर चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होता. ही वधूदेखील तिची चाहती वाटते. कारण तिने रिसेप्शनमध्ये हटके एन्ट्रीसाठी नवदेवासोबत रेस्टिंग फिनिश मूव्ह करत वऱ्हाड्यांना धक्का दिला. 



हा मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्याला आतापर्यंत लाखो यूजर्स मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम thekevinryder या अकाऊंटवर तो शेअर करण्यात आला आहे.


 


हेसुद्धा वाचा - धावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral


 


कंमेट्स बॉक्समध्येही यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जणांनी नवरीच्या या कृत्याची निंदा केली आहे. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात खास क्षण असतो. तो अशा प्रकारे साजरा करणं कितपत योग आहे, असा प्रश्न काही यूजर्सने विचारला आहे. तर काही जणांना नवरीची लग्नात अशी एन्ट्री अतिशय आवडली आहे. काही असो पण लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, हे नक्की.