Trending News :  लग्न सोहळा हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. या आनंदाच्या क्षणात आपण नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि ओळखीतील सगळ्यांना आमंत्रण देतो. या अनमोल क्षणाला खास करण्यासाठी आपण एक एक गोष्टी खास करतो. त्यामुळे हा लग्न सोहळा अविस्मरणीय असावा यासाठी लोकं पाण्यासारखा पैसा खर्च करता. सध्या हायफाय लग्नाचा ट्रेंड आला आहे. लग्नातील प्रत्येक सोहळा आजकाल मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशा भव्य सोहळ्यासाठी आईवडिलांची आयुष्यभराची कमाई खर्च होते. अनेक आई-वडिलांना मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज घ्यावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण एका महिलेने लग्नात होणाऱ्या या खर्चासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. इतर मुली सारखं तिचं पण स्वप्न आहे की तिचं लग्न भव्यदिव्य असावं. यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे. तशी ही महिला गरीब नाही तर एक प्रसिद्ध मॉडल आहे. त्यामुळे तिला हे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. तरीसुद्धा तिने ही निर्णय घेतला आहे. 



लग्नासाठी होणार 38 लाखांचा खर्च



या महिलेच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास 38 लाखांचा खर्च होणार आहे. या महिलाने केप वर्डेमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथे जाण्यासाठी जवळपास 2 लाखांपर्यंत विमानाचा खर्च आहे. तर लग्नाच्या दिवशी ती पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून ग्रँड एन्ट्री करणार आहे. तर लग्नाची पार्टी हिल्टनमधील फाइव स्टाप हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नाची अंगठीची किंमत जवळपास 6 लाखांची तर लग्नाचा ड्रेससुद्धा 6 लाखांच्या घरात आहे. हे पाहून कळतं की, या महिलेच्या लग्नात भरपूर पैसा लागणार आहे, हे नक्की. 


पाहुण्यांकडून वसूल करणार लग्नाचा खर्च



या मॉडलने तिच्या लग्नाचा खर्च सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने लग्नासाठी 30 जणांना निमंत्रण दिलं आहे. या 30 जणांना तिने प्रत्येकी 9 हजारांपेक्षा जास्त पैसे द्यायला सांगितले आहे. 


कोण आहे 'ही' मॉडल आणि का घेतला तिने 'हा' निर्णय?



लग्नाची हटके प्लानिंग करणाऱ्या या मॉडेलचं नाव आहे Karla Bellucci. ती 40 वर्षांची असून तिचं हे दुसरं लग्न आहे. कार्लाला 4 मुलं देखील आहेत. ती 52 वर्षीय जोवानी या व्यक्तीशी लग्न करणार आहे. कार्ला म्हणते, मला आपल्या लग्नात काही कमी सोडायची नाही आहे. हा लग्नसोहळा मला ग्रँड करायचा आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. पण हा खर्च करुन मला गरीब व्हायचं नाही आहे. म्हणून तिने पाहुण्यांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.