भयंकर! धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, 20 लाख घरांचं मोठं नुकसान
काळ आणि वेळ दोन्ही एकत्रच....धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली आणि.... पाहा काळजाचा ठोका चुकवणारे फोटो
जपान : एक धक्कादायक बातमी आहे. साधारण 500 किलोमीटर ताशी वेगानं धावणारी बुलेट ट्रेन रुळावरून घसरली आहे. तर दुसरीकडे घर दुकानं आणि मॉल उद्ध्वस्त झालं आहे. ही धक्कादायक घटना जपानमध्ये घडली आहे. जपानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के बसल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जपानला शक्तीशाली भुकंपाचा धक्का बसला आहे. या भुकंपाची तिव्रता 7.3 रिश्टर स्केल एवढी होती.उत्तर जपानच्या फुकुशिमा किनारपट्टीच्या भागात हा भुकंप झाला. भूकंपामुळे 20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. तसंच या भागात त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
मियागी आणि फुकुशिमा भागात समुद्रात एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भूकंपाने टोकियोसह अनेक भागांतील इमारतींना हादरे बसले आहेत. या भूकंपामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
भूकंपानंतर आता 20 लाखहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बुधवारी रात्री 8 वाजता जपानच्या टोक्योमध्ये 297 किमी उत्तर पूर्व भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले.
स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटांचा इशारा देण्यात आला. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचं केंद्र समुद्राच्या 60 किलोमीटर खाली होतं. हा भाग उत्तर जपानमध्ये येतो.