Trending News : आपल्या लग्नात काही तरी खास असावं. आपलं लग्न सगळ्यात हटके असावं यासाठी अनेक तरुण-तरुणी भन्नाट आयडिया शोधून काढतात. गेल्या काही वर्षांमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचं प्रमाण वाढलं आहे. डेस्टिनेशन वेडिंग सोहळ्यात लाखो रुपय पाण्यासारखे खर्च होतात. पण परदेशातील एका कपलने आपल्या लग्नासाठी अशा काही खास गोष्टी केल्या की सध्या त्यांचं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 


अनोखा विवाह 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकालच्या तरुण पिढीमध्ये निसर्गाविषयी खूप संवदेना आहेत. आपण पाहिलं आहे की, लोकं लग्नसोहळ्यात उगाचच गरज नसतानाही उधळपट्टी करतात. मग तो पैसा असो किंवा अन्न, लग्नात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. मुलीच्या लग्नात लज्जतदार जेवण्यासाठी वडिलांचा आयुष्यभराची पुंजी जाते. आपण पाहिलं आहे की याच जेवणावर आपण नंतर चांगल आणि वाईटचं लेबल लावतो. हे कितपत योग्य आहे. आजकाल अन्नाचा नासाडीबद्दल लोकं जागृत झाली आहेत. ते लग्नातील उरलेलं जेवण दान करत आहेत. इटलीमधील या जोडप्याने खास विवाहसोहळ्याचं आयोजन केलं. या जोडप्याने इटलीमध्ये 3 लाखांमध्ये आपल्या विवाहसोहळा संपन्न केला. 


लग्नासाठी खास पोषाख 


अन्ना मासिएलो आणि बना डिओगो लिन्हारेस यांचा विवाहाचा पोशाखही खूप खास होता. त्यांनी आपल्या लग्नात Recycled फॅब्रिकपासून तयार केला ड्रेस घातला होता. या लग्नात या जोडप्याने पर्यावरणाचा विचार करुन लग्नाचं सेटअप करण्यात आलं होतं. वाळलेल्या पानांनी आणि फुलांनी त्यांच्या लग्नाचं गार्डन सजविण्यात आला होता. 


वऱ्हाडी पाहुण्यांना सेकेंड हँड कपडे


'द मिरर' यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचं लग्न फार्मवर झालं होतं. लग्नाच्या दिवशी दिवसभर पाऊस सुरु होता. लग्नसोहळ्यानंतर या जोडप्याने जोरदार डान्स केला. या जोडप्याने अजून एक आदर्शपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी लग्न समारंभाला आलेल्या पाहुण्यांना सेकेंड हँड कपडे भेट म्हणून दिले. या जोडप्याने जीरो वेस्ट वेडिंग करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.