Video : केबिन बॅगेजमध्ये आग , कर्मचार्यांनी आग विझवण्यासाठी केला पाणी, ज्यूसचा वापर
विमानातील ओव्हर हेड कम्पार्टमेन्टमध्ये आग अचानक आग लागल्याने विमानाचे उड्डाण सुमारे 3-4 तास उशिरा झाले.
चीन : विमानातील ओव्हर हेड कम्पार्टमेन्टमध्ये आग अचानक आग लागल्याने विमानाचे उड्डाण सुमारे 3-4 तास उशिरा झाले.
प्रवासी विमानात नसल्याने मोठा अनर्थ टळला परंतू आगीला आटोक्यात आणण्यासाठी पाणी आणि ज्यूसचा वापर करण्यात आल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
का लागली आग ?
विमानात ओव्हर हेड कम्पार्टमेन्टमध्ये प्रवाशांना काही सामान घेऊन जाण्याची परवानगी असते. चीनमध्ये एका डोमेस्टिक विमानात पॉवर बॅंकेने अचानक पेट घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर
चीनमध्ये Guangzhou ते Shanghai (Boeing 777-300ER B-2009)या विमानामध्ये पॉवर बॅंकेने पेट घेतला होता. मात्र यानंतर कॅबिन क्रुने ही आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंगिशरऐवजी पाणी आणि ज्यूसचा वापर केल्याने हा व्हिडिओ झपाट्याने शेअर केला जात आहे. तसेच प्रवाशांनी देखील आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केल्याने कर्मचार्यांनाही ट्रोल केले आहे.
मोठा अनर्थ टळला
विमानात सारे प्रवासी चढण्यापूर्वी हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. विमानातील प्रवाशांना सुरक्षितपणे दुसर्या विमानात हलवण्यात आले. तसेच वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.