Google Maps : गुगल मॅपमुळे आता प्रवासात पत्ता शोधताना कुणाची फारशी मदत घ्यावी लागत नाही. मात्र, कधी कधी हा गुगल मॅपच प्रवाशांची दिशाभूल करतो. गुगल मॅपमुळे एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह मोठ्या अडचणीत सापडला. गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरुन प्रवास करताना हा व्यक्ती आपल्या बायका मुलांसह निर्मनुष्य वाळवंटात पोहोचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील एका व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे.  कॅलिफोर्नियातील एक कुटुंब लास वेगासहून परतत होतं. त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली. गुगल मॅपने त्यांना 'शॉर्टकट' मार्ग दाखवला आणि ते वाळवंटात अडकले. डेली मेलने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे.  हे कुटुंब लॉस एंजेलिसमधील फॉर्म्युला 1 रेसमधून कॅलिफोर्नियाला परतत होते. त्यांना रस्ता माहित नव्हता. यामुळे त्यांनी गुगल मॅपवर  लोकेशन टाकले. लोकेशनमध्ये प्रवेश करताच गुगल मॅपने  त्यांना वाटेत धुळीचे वादळ दाखवले. याचेवळी गुगल मॅपने त्यांना दुसरा मार्ग देखील सुचवला. यामुळे त्यांनी पर्याय म्हणून तुम्ही दुसरा मार्ग निवडला. गुगल मॅपने सुचवलेल्या पर्यायी मार्गावरुन यांनी प्रवास सुरु केला आणि ते मोठ्या अडचणीत सापडले. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे. मात्र, आता हे प्रकरण चर्चेत आले आहे.


गुगल मॅपमुळे वाळवंटात पोहोचला


गुगल मॅपमुळे हे कुटुंब वाळवंटात पोहोचले. लोकेशनवर पोहचण्यासाठी मॅपवर 50 मनिटांचा वेळ दाखवत होता. लोकेशन फॉलो करण्याचा प्रयत्न करत असताना, कुटुंब महामार्गापासून दूर गेले आणि झाडाझुडपांतून नेवाडाच्या वाळवंटात पोहोचले. पुढे रस्ताच संपला. 


गुगल मॅपने रस्ता चुकवला


तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सहज आणि सुलभ झाल्या आहेत. मात्र, हेच तंत्रज्ञान लोकांना अडचणीत देखील आणत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुगल मॅप. सॅटेलाईटच्या मदतीने गुगल मॅपमध्ये लोकेशन दाखवली जाते. बऱ्याचदा बंद रस्ते, तसेच अनेक तांत्रिक अडथळे यांची माहिती गुगल मॅपवर अपडेट केली जात नाही. यामुळे वाहनक अडचणीत येतात. गुगल मॅपमुळे एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. बंद असलेल्या  पुलावर कार गेल्याने कार थेट नदीत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.