भारत - पाकिस्तान होऊ घातलेली चर्चा रद्द
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये न्यूयॉर्क येथे होऊ घातलेली चर्चा रद्द करण्यात आली आहे. भारताने चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये न्यूयॉर्क येथे होऊ घातलेली चर्चा रद्द करण्यात आली आहे. भारताने चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीमेवर शहिदाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. तर काश्मीरी अतिरेकी बुरहान वानी याच्यावर टपालतिकिट काढत पाकिस्ताननं खोडी काढलीये. काश्मीरातल्या अपहरण झालेल्या तिघा पोलिसांचे मृतदेह हाती लागलेत.
या परिस्थितीत पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानात सत्तांतर झाले असले तरी त्या देशाच्या कुरापती कमी होत नसल्याचे या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.