मुंबई: हॉलिवूडचा सिनेमा किंवा वेब सीरिजमध्ये गाड्यांच्या अपघाताचे जबरदस्त सीन शूट केलेले असतात. असाच एक सीन प्रत्यक्षात घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला फायनल डेस्टिनेशनमधील तो सीन आठवल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लाल रंगाची गाडी वेगानं येत आहे. त्याचवेळी शेजारहून भरधाव गाडी येते आणि लाला गाडीला जोरात धडक देते. या गाड्य़ांचं नुकसान तर होतच शिवाय आजूबाजूच्या भिंतीचं आणि गेटचंही नुकसान या अपघातात होतं. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



हा व्हिडीओ आतापर्यंत हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. बऱ्याचदा असे सीन सिनेमात पाहायला मिळतात. मात्र असं काही प्रत्यक्षात घडेल अशी कल्पनाही कुठे नसते आणि त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. 


एकदा नाही तर दोनवेळा हा प्रकार घडला आहे. तीन दिवसांनी पुन्हा एकदा दोन काळ्या रंगाच्या गाड्या एकमेकांवर धडकल्या. या दोन्ही घटना एकाच ठिकाणी घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.