इथं अंघोळ न करणाऱ्यांचा शाल- श्रीफळ देऊन होतो सत्कार; परंपरेमागचं लॉजिक पाहून हैराणच व्हाल
World News : जगात अशी कैक ठिकाणं आहेत ज्यांचं भौगोलिक महत्त्वं आणि तिथं असणाऱ्या परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की पाहताक्षणी हैराणच व्हायला होतं.
World News : एखाद्या ठिकाणी गेलं असतं तिथला परिसर, वातावरण आणि इतर गोष्टींवर आपली नजर खिळते. विशेष म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा सहलीसाठी, किंवा नव्यानं एखादा प्रदेश पाहण्यासाठी जातो तेव्हा सर्वकाही छानछानच असेल अशीच आपली अपेक्षा असते. पण, हेच 'सर्वकाही' घाणेरडं असेल तर? ऐकूनच कसंतरी झालं ना? पण, या जगात एक असं गाव आहे जे तिथल्या घाणेरडेपणासाठी ओळखलं जातं. तुम्हाला माहितीये?
घाणेरडेपणा हीच इथली ओळख...
प्रथमत: तुमचाही विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. मध्य इटलीच्या अॅड्रीएटीक समुद्र आणि अपेनाईन पर्वतरांगांमध्ये Piobbico (पोईबिको) एक एक गाव वसलं आहे. इथं सर्वत्र दगडी इमारती आणि त्याभोवती गर्द झाडी पाहायला मिळते. पण, या निसर्गसौंदर्यापेक्षाही हे गाव, राजधानीचं ठिकाण तिथल्या नागरिकांच्या घाणेरडेपणासाठी ओळखलं जातं.
1879 व्या वर्षापासूनच साधारण 2 हजारांची लोकसंख्या असणारं हे गाव Club dei Brutti म्हणजेच घाणेरड्यांचा क्लब म्हणून ओळखलं जात आहे. या संस्थेशी संलग्न असणाऱ्या व्यक्तींच्या मते एखादी व्यक्ती प्रत्यक्षात कशी आहे हे त्याच्या रुपाहून महत्त्वाचं असतं. आज या संस्थेशी साधारण 30 हजारांहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत.
हेसुद्धा वाचा : जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
सुरुवातीला Club dei Brutti ही संस्था गावातील महिलांना जोडीदार शोधण्यासाठी काम करत होती. पण, त्यानंतर मात्र स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्तीच्या अंतर्मनाच्या सौंदर्याचा ठाव घेणारी ही मोहिम पुढं नेली. या संस्थेमध्ये वरिष्ठ सदस्य इतर नवख्या सदस्यांना unspecified आणि extraordinarily ugly अशा श्रेणीही देतात. बरं इथं दुसरे काय विचार करतील याचाच विचार दूरदूरपर्यंत केला जात नाही.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी इथं जगभरातून Festival of the Ugly मध्ये सहभागी होण्यासाठी अनेकजण येतात. इथं खाण्यापिण्याचीही चंगळ असते. याच आगळ्यावेगळ्या आणि काहीशा विचित्र महोत्सवामध्ये ही मंडळी त्यांच्या प्रमुखाचीही निवड करतात. काय मग, तुम्ही शक्य होईल तेव्हा या गावाला भेट देणार ना? कारण तिथं होतोय अंघोळ न करणाऱ्यांची सत्कार!