Chatillon Car Graveyard: मुंबई, दिल्ली, बंगळुरू असो किंवा अगदी व्हर्जिनिया, बोस्टन, लंडन या सर्व शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या काही नवीन नाही. तुम्हाला अर्जंट कुठे जायचं असेल तेंव्हाच हा ट्रॅफिस लागतो आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्या कुणालाच ट्रॅफिकमध्ये अडकणं अजिबात आवडत नाही. याच ट्रॅफिक बद्दल जराशी हटके आणि इंट्रेस्टिंग बातमी. जगात एका ठिकाणी बंपर टू बंपर ट्रॅफिक जॅम लागलाय. बरं सर्वसाधारण ट्रॅफिक जाम हा तास, दोन तास किंवा अगदी सहा ते आठ तासांत सुटतो. मात्र हा ट्राफिक जॅम तब्बल 75 वर्षांपासून लागलाय. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्नही तुम्हाला पडेल. म्हणूनच याबाबत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हा ट्राफिक आहे  दक्षिण बेल्जियममध्ये, जो तब्बल 75 आजपर्यंत सुटलेला नाही. आता तुम्हाला वाटेल या गाड्या चालवणाऱ्यांचं काय झालं असेल? तेही जाणून घेउया. 


रस्त्यावर उगवली झाडं तरीही कार्स तिथेच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जागा आहे दक्षिण बेल्जीयममधील. दक्षिण बेल्जियममधील चॅटेलॉन नजीकच्या एका जंगलाच्या मध्यभागी गंजलेल्या गाड्यांचं स्मशान आहे. या गाड्या त्यावेळी तिथे तैनात असलेल्या अमेरीकी सैन्याच्या होत्या. दरम्यान दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व तुकड्या पुन्हा अमेरिकेत परतल्या. मात्र या कार्स पुन्हा परत घेऊन जाणं परवडणारं नव्हतं. ज्यांना त्यांच्या कार्स पाहिजे आहेत त्यांना संपूर्ण खर्च करून या गाड्या परत आणाव्या लागणार होत्या. म्हणूनच या कार्स तिथेच सोडून सर्व अधिकारी पुन्हा अमेरिकेत परतले. या गाड्या आजही तिथे एकामागून पार्क झालेल्या पहायला मिळतात. इतक्या वर्षांपासून या कार्स तिथे उभ्या असल्याने आता त्या जागेवर झाडं झुडुपं देखील उगावल्याचं पाहायला मिळतं. यातील इंट्रेस्टिंग बाब हणजे इथे तिथे आसपास चार असे कार ग्रेव्हीयार्ड आणि साधारणतः 500 गाड्या होत्या. मात्र यातील काहींना गांजल्या, सडल्या, काही स्थानिकांनी घेतल्या किंवा संग्रह करणात्यांनी घेतल्या असं बोलतात.  



सुरुवातीला याबाबत स्थानिकांना माहिती नव्हती, म्हणून त्यांना याची भीती देखील वाटायची. मात्र हळूहळू सर्व गोष्टी समोर आल्यात. या गाड्या एकामागोमाग एक रांगेत उभ्या असल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळतं. हे फोटो एखाद्या ट्रॅफिक जॅम सारखेच पाहायला मिळतात. 



Chatillon Car Graveyard in Belgium unique village where cars are standing since 75 years