अमेरिकेतील बास्केटबॉल सामन्यात चीअर लीडर्सचे `घुमर` नृत्य...
वादग्रस्त ठरलेला दीपिकाचा पद्मावतने प्रदर्शनानंतर चांगलीच बाजी मारली.
नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेला दीपिकाचा पद्मावतने प्रदर्शनानंतर चांगलीच बाजी मारली. चित्रपटाबरोबरच 'घुमर' गाणेही वादाच्या भोवऱ्यात अडकले. इतके की दीपिकाची कंबर झाकून हे गाणे पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. असे जरी असले तरी देशविदेशात हे गाणे लोकप्रिय ठरले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नॅशनल बास्केट बॉल असोसिएशनच्या मॅचदरम्यान बास्केट बॉल कोर्टात चीअर्स लीडर्स या गाण्यावर नृत्य सादर केले.
देसी घुमर' लोकप्रिय
खेळाडू, प्रेक्षक सर्वच परदेशी असतानाही 'देसी घुमर' अत्यंत लोकप्रिय ठरला. एनबीएने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हा डान्स व्हिडिओ शेअर केला. चीयर लीडर्सचा हा डान्स तुम्ही पाहू शकता...
पद्मावतची कमाई
पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चार दिवसात चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाची ६ दिवसाची कमाई १४३ कोटी होती आणि लवकरच चित्रपट १५० कोटींचा आकडा पार करेल.