Cheetah Video: चित्त्याची पार्कात कासवासोबत मस्ती, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल व्हिडीओत चित्ता कासवासोबत मस्ती (Cheetah Fun with Turtle) करताना दिसत आहे. दोघांची बॉन्डिंग पाहून जिगरी दोस्त असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
Cheetah Viral Video: गेले दोन दिवस देशात चित्त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त आफ्रिकेच्या नामिबियामधून भारतात आठ चित्ते आणण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (MP Kuno National Park) या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे. असं असताना चित्त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कार्सन स्प्रिंग्स वाइल्डलाइफने गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हायरल व्हिडीओत चित्ता कासवासोबत मस्ती (Cheetah Fun with Turtle) करताना दिसत आहे. दोघांची बॉन्डिंग पाहून जिगरी दोस्त असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. एक कासव आरामात मैदानात बसला असून चित्ता त्याच्यावर डोकं ठेवून आरामात झोपल्याचं दिसत आहे.
चित्ता नुसता झोपलेला नाही तर डोकेही खाजवताना दिसत आहे. कासवही त्याची निमुटपणे काळजी घेत आहे. कासव देखील आपल्या त्याच्यासोबत मजा करताना दिसत आहे. कोण आहे? हे पाहण्यासाठी त्याचे डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
कार्सन स्प्रिंग्स वाइल्डलाइफने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'टूझ्डे आणि पेन्झी हे बेस्ट फ्रेंड्स आहेत. या आणि त्यांना कार्सन स्प्रिंग्समध्ये पाहा.' कार्सन स्प्रिंग्स हे युनायटेड स्टेट्समधील गेनेसविले, फ्लोरिडा येथील नॉन-प्रॉफिट एक्जोटिक अॅनिमल अँड एनडेंजर्ड स्पिसीज अॅनिमल पार्क आहे. व्हायरल क्लिप 1.1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून त्याला 56,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.