Drop Mobile Phone in Fryer: मोबाईल फोन ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, एका गाजलेल्या मराठी चित्रपटामधील हा गाजलेला संवाद आज पदोपदी प्राकर्षाने जावणवतो. आज अगदी प्रवास करताना, चालताना किंवा अगदी झोपण्याआधीही स्मार्टफोन रुपी पाच इंचाची स्क्रीन आपल्या सोबत असते. आज आपण या गॅजेटवर इतके अवलंबून झालो आहोत की स्वत:चा क्रमांक वगळता घरच्यांचे फोन नंबरही आपल्यापैकी अनेकांना पाठ नसतात. फोनवर आज आपण इतके अवलंबून रहायला लागलो आहोत की क्षणभरही आपल्याला त्यापासून दूर राहता येत नाही. अनेकदा तर अचानक लोकांना आपल्या मोबाईलबद्दल आठवतं आणि ते शर्टाच्या किंवा पॅण्टच्या कोणत्या खिशात ठेवला हे शोधण्याचा प्रयत्न लोक करु लागतात. लगेच खिशातून फोन काढून तपासण्याच्या घाईतून अनेकदा गोंधळही उडतो. अशावेळेस घाईत एखादा फोन आला आणि तो शोधून उचलताना एक चूक केली तरी मोठा भूर्दंड भोगावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेबरोबर किचनमध्ये झाला.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मोबाईलचे दुष्परिणाम दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला एका मोठ्य़ा किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. हे किचन एखाद्या हॉटेल किंवा हॉलचं प्रोफेश्नल किचन वाटत आहे. इतक्यात या महिलेला एक फोन येतो. ही महिला खिशामधून आपला फोन काढते. एका हाताने काम सुरु असतानाच दुसऱ्या हाताने फोन रिसिव्ह करावा असा या महिलेचा विचार असतो. मात्र या घाई गडबडीत महिलेच्या हातून फोन निसटतो आणि तो थेट डीप फ्रायरमध्ये पडतो. ही महिला घाबरुन डीप फ्राय केलेले पदार्थ बाहेर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिमट्याच्या मदतीने फोन उकळत्या तेलातून बाहेर काढते. मात्र तोपर्यंत हा फोन काही सेकंदांसाठी उकळत्या तेलात पडल्याने बंद झाल्यासारखं प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.



हा व्हिडीओ सोशल मीडियावर सीसीटीव्ही व्हिडीओज नावाच्या हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ही बातमी लिहीपर्यंत 32 लाखांपर्यंत व्ह्यूज आहे. व्हिडीओला 21 हजारांहून अधिक लाइक्स आहेत.