Trending Video: चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून दुकानाला लावली आग
Viral Video : सध्या सोशल मीडियावर चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून एका व्यक्तीने संतापाच्या भरात जे कृत्य केलं त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो.
Chicken Biryani : भारतामध्ये (India) अनेक जण नॉनव्हेजप्रेमी आहेत. नॉनव्हेजमध्ये (non veg) चिकन बिर्याणी (Chicken Biryani) तर अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. भारतात अनेक प्रकारच्या चिकन बिर्याणी मिळते. हैद्रराबादी चिकन बिर्याणी (Hyderabadi Chicken Biryani), चिकन दम बिर्याणी (Chicken Dum Biryani), मुघलाई चिकन बिर्याणी (Mughlai Chicken Biryani) सारखे अनेक रेसिपी आपल्याला मिळतात. भारताच्या कानाकोपऱ्यात चिकन बिर्याणीचे अनेक हॉटेल (Hotel), रेस्टारेंट (restaurant) आपल्याला दिसतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून एका व्यक्तीने संतापाच्या भरात जे कृत्य केलं त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल (Viral) होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून अंगावर काटा येतो.
बिर्याणी दिली नाही म्हणून...
न्यूयॉर्क पोस्टनुसार, एक व्यक्ती बांग्लादेशी (Bangladeshi) रेस्टारेंटमध्ये चिकन बिर्याणी खाण्यासाठी गेला. पण तो नशेत असल्याने त्याला रेस्टारेंट मालकाने चिकन बिर्याणी देण्यास मनाई केली. त्यामुळे या व्यक्तीला प्रचंड संताप आला आणि तो रेस्टारेंटच्या मालकाला अद्दल घडविण्यासाठी कट रचला. दुसऱ्या दिवशी रात्री तो त्या रेस्टारेंट बाहेर पोहचला आणि चक्क त्याने रेस्टारेंटला आग लावली. या आगीचे लोट इतके भयानक असतात तोही या अग्नीकांडमध्ये भाजला जातो. (chicken biryani not getting Man new york restaurant set on fire Video nmp)
आरोपी गजाआड
ही घटना अमेरिकेतील (America) न्यूयॉकमधील (New York) आहे. तर चोफेल नोरबू (Chofel Norbu) असं या व्यक्तीचं नाव असून त्याने केलं कृत्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झालं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर हा व्हिडीओ न्यूयॉक अग्निशमन दलाच्या विभागाने जारी केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.