चीननं तयार केली जगातली सर्वात मोठी पाणबुडी; आख्खा देश उद्धवस्त करण्याची शक्ती
चीनने तयार केली जगातील सर्वात खतरनाक पाणबुडी...
नवी दिल्ली : चीन आणि अमेरिका दरम्यान तणावपूर्ण संबंध निर्माण झालेले असतानाच चीननं रुस टायफून वर्गातली सर्वात मोठी पाणबुडी तयार केली आहे. टाईप 100 असं या पाणबुडीचं नाव आहे. चीनमध्ये कम्युनिस्टांच्या सत्तेला यंदा 100 वर्षं पूर्ण होत आहेत.
त्यामुळेच या पाणबुडीला टाईप 100 असं नाव देण्यात आलंय.
टाइप-100 क्लासच्या या पाणबुडीवर क्षेपणास्त्रंही तैनात करता येतात.
काही अण्वस्त्रंही या पाणबुडीवर तैनात करता येतात
त्यामुळे अवघ्या काही क्षणांत छोटे मोठे देश उध्वस्त होऊ शकतात
या पाणबुडीवर एक स्पेशल हँगर लावण्यात आलाय
त्या हँगरमध्ये आणखी छोट्या पाणबुड्याही बसवल्या जाऊ शकतात
210 मीटर लांब आणि ३० मीटर रुंद अशी ही पाणबुडी आहे
या पाणबुडीवर एक मानवरहित व्हेईकल आहे, जे शत्रूच्या भागाता जाऊन रेकी करु शकतं
रशियाच्या टायफून क्लासच्या या पाणबुड्या रशियाची शान समजल्या जातात. चीननं तयार केलेली ही पाणबुडी रशियाच्या पाणबुड्यांपेक्षाही महाशक्तिशाली आहे.
अशा मोठमोठ्या पाणबुड्या महिनोनमहिने समुद्राखाली लपून राहतात. शत्रूला त्यांचा सुगावा लागणं कठीण असतं.
शक्तिशाली अशा पाणबुड्यांसह एकेकाळी समुद्रावर रशियाचं राज्य होतं.
आता चीनच्या या समुद्रातल्या नव्या राक्षसानं रशियाच्या समुद्री साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली आहेत.