नोकरी म्हणजे शिक्षाच! टार्गेट पूर्ण न केल्यास खावी लागतात कच्ची अंडी
नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचा योग आला तर तिथले नियम आणि कायदे माहिती असणं आवश्यक आहे.
Punishment For Employee: जसा देश, तसा वेश असं म्हटलं जातं. कारण प्रत्येक देशाचं राहणीमान , तसेच नियम आणि कायदे वेगवेगळे असतात. नोकरी, कार्यसंस्कृती असो की इतर मुद्दे आपल्याला प्रत्येक बाबतीत विविधता दिसते. त्यामुळे इतर देशात राहणं किंवा कामासाठी जाणं डोकेदुखी ठरते. नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचा योग आला तर तिथले नियम आणि कायदे माहिती असणं आवश्यक आहे. चीनमध्ये नोकरी करण्याचा योग आला तर ही बातमी एकदा वाचा. कारण चीनमध्ये नोकरी करणं एका शिक्षेसारखं आहे. एका चिनी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेली विचित्र शिक्षा चर्चेत आहे. कर्मचाऱ्यांनी टार्गेट वेळेत पूर्ण केलं नाही तर विचित्र शिक्षा भोगावी लागते. अन्यथा नोकरी गमवावी लागू शकतेय
चीनमधील एक कंपनीने आपल्या कर्मचार्यांना अपेक्षित काम न केल्यामुळे विचित्र शिक्षा देते. काम पूर्ण न केल्यास कच्ची अंडी खावी लागतात. जर कर्मचाऱ्याने नकार दिला तर त्याला त्याची नोकरी देखील गमवावी लागू शकते. या शिक्षेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यास भाग पाडले जाते. एका इंटर्नने आपला तंत्रज्ञान कंपनीबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एचआर देखील कर्मचाऱ्यांसोबत क्रूरपणे वागतात. तसेच कायद्याने मनाई नसल्याचं अरेरावी देखील केली जाते.
झेंगझोउ या चिनी कंपनीमध्ये ही शिक्षा देण्यात आली आहे. एखाद्याला त्याचे टार्गेट वेळेवर पूर्ण करता आले नाही आणि कंपनीच्या अपेक्षेनुसार काम केले नाही तर त्याला कच्ची अंडी खावी लागतात. इंटर्नशिपदरम्यान त्याने तसे करण्यास नकार दिल्याने व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांना अंडी खाताना उलट्याही होतात, पण त्यामुळे व्यवस्थापनाला काहीही फरक पडत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या हे विचित्र प्रकरण समोर आल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनुभवही शेअर करत आहेत. हे अमानुष वर्तन असून कच्ची अंडी खाल्ल्याने शरीराचे अनेक नुकसान होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.