भारतातील चीनच्या नागरिकांना चीनकडून सूचना
सध्याच्या भारत चीन दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतात जाताना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना चीन सरकारनं त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत.
नवी दिल्ली : सध्याच्या भारत चीन दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतात जाताना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना चीन सरकारनं त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत.
सिक्कीममधल्या वादग्रस्त टोकाच्या मुद्द्यावरुन सध्या दोन्ही देशांतले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या चीनी दुतावासानं त्यांच्या नागरिकांसाठी सुरक्षेचं सूचनापत्र जाहीर केलं आहे.
यामध्ये स्थानिक सुरक्षेची स्थिती यावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. तसंच स्वसंरक्षणाबाबत जागरुकता वाढवणं, अनावश्यक प्रवास टाळणं, स्वतःची, सोबतींची आणि सामानाची काळजी घेण्याचं आवाहन यात करण्यात आलंय.