चीनच्या भारतीय सीमेजवळ पुन्हा हालचाली, 25 फायटर जेट तैनात
China increases deployment of fighter aircraft : भारत - चीन सीमेवर पुन्हा एकदा चीनने आगळीक केली आहे. चीनची फायटर एअरक्राफ्ट चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली आहेत.
नवी दिल्ली : China increases deployment of fighter aircraft : भारत - चीन सीमेवर पुन्हा एकदा चीनने आगळीक केली आहे. चीनची फायटर एअरक्राफ्ट चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली आहेत. पूर्व लडाखलगत असलेल्या होतान या एअरबेसवर चीनने 25 फायटर जेट्स तैनात केली आहेत.
चीनने भारतीय हद्दीजवळ लढाऊ विमानांची तैनाती वाढवली आहे. पूर्व लडाख सेक्टरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने सांगितले असताना, चिनी हवाई दलाने भारतीय हद्दीजवळील मुख्य तळावर लढाऊ विमानांची तैनाती दुप्पट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
चीनने या आधी या एअरबेसवर 12 विमानं तैनात केली होती. आता इथे 25 फायटर जेट्स तैनात करण्यात आली. अमेरिकन मिलिटरी ऑफिसरने सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून ही माहिती उघड केली आहे. भारतीय लष्करी यंत्रणाचंही या हालचालींकडे बारकाईने लक्ष आहे.
होतानपासून जवळच चीन शाकचे या भागातही नवा एअरबेस उभारण्याचं काम वेगाने करत आहे. सीमावादावेळी भारतीय वायुदलाची तयारी चीनपेक्षा अव्वल होती, तसंच भारतीय वायुदलाची या भागातली हालचाल वेगवान होती हे लक्षात घेऊन चीनने आता इथे वायुदल भक्कम करायला सुरुवात केलीय. काशगर, होतान, गारीगुंसा, शिगात्झे, ल्हासा गोंकार, नीयिंगची, चाम्डो पांगटा भागात हे एअरबेस चीनने उभारले आहेत.