बिजींग : आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार जमेल ते प्रयत्न करतो. खोटे बोलतो, पुरावे मिटवतो. मात्र एक गोष्ट तुम्हाल चकीत करेल. ती म्हणजे एका खुन्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी तब्बल १२ वर्ष मुका असण्याचे नाटक केले. मात्र हेच नाटक त्याच्या अंगाशी आले आणि त्याची कायमची बोलती बंद झाली. त्याने आपली बोलण्याची क्षमता गमावली.


कोण आहे ती व्यक्ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीचे आडनाव जेंग असून तो पूर्वी झेजियांग या भागात रहात होता. २००५ मध्ये त्याने आपल्या पत्नीच्या काकांचा केवळ ५०० युवानसाठी (७६ डॉलर) खून केला. त्यानंतर त्याने आपले गाव सोडले.तेव्हा जेंग ३३ वर्षांचा होता. त्यानंतर त्याने मुके असण्याचे नाटक सुरू केले आणि कोणत्यातरी कंस्ट्रक्शन साईटवर नोकरी शोधू लागला. त्याने आपले नाव बदलले आणि दूसरे लग्नही केले. त्याला मुलेही झाली. 


अखेर गुन्हेगार सापडला


मात्र काही कागपत्रांनिमित्त तो स्थानिक पोलीसांच्या संपर्कात आला. पोलीसांना संशय येताच त्यांनी डीएनए टेस्ट केली. आणि गेल्या १२ वर्षांपासून शोधत असलेला गुन्हेगार त्यांना सापडला.


त्याचा कबुलीजबाब


त्यावेळी दिलेल्या कबुलीजबाबात त्याने लिहिले की, गेल्या १२ वर्षांपासून करत असलेल्या नाटकामुळे तो आता बोलू शकत नाही. अधिक तपासात गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.